News Flash

“माझा मुलगा कुठे आहे?”; ‘खतरो के खिलाडी’साठी अफ्रिकेला गेलेल्या श्वेता तिवारीला अभिनवचा सवाल

अभिनवचे सोशल मीडियावरून श्वेतावर आरोप

अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. श्वेताचं दुसऱं लग्न मोडल्यानंतर तिचा दुसरा पती अभिनव कोहली आणि श्वेतामधील वाद काही संपण्याचं नाव घेत नाहीत. श्वेता आणि अभिनव यांनी आजवर एकमेकांवर खुलेआम अनेक आरोप केले आहेत. खास करून श्वेता आणि अभिनव यांचा मुलगा रेयांश यांच्या ताब्यावरून अनेकदा दोघांमध्ये वाद रंगले आहेत. नुकतेच अभिनवने श्वेतावर काही गंभीर आरोप केले आहेत.

काही दिवसांपूर्वीच वजन कमी केल्यामुळे श्वेता सोशल मीडियावर चर्चेत होती. सोशल मीडियावर ती तिचे ग्लमरस फोटो शेअर करून चाहत्याचं लक्ष वेधत होती. त्यानंतर आता श्वेता लवकरच खतरो के खिलाडी या शोमध्ये झळकणार आहे. या शोच्या अकराव्या पर्वासाठी ती दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन शहरात रवाना झालीय. शुक्रवारी श्वेता अफ्रिकेला गेल्यानंतर तिचा भावी पती अभिनवने मुलागा रेयांश कुठेय असा सवाल उपस्थित केलाय.

अभिनवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यात त्याने मुलगा रेयांशबद्दल चिंता व्यक्त केलीय. अभिनव या व्हिडीओत म्हणाला, “श्वेता खतरो के खिलाडीसाठी साउथ अफ्रिकेला गेलीय. काही दिवसांपूर्वीच तिने रेयांशला घेऊन शोसाठी अफ्रिकेला जाण्यासाठी विचारलं होतं. मात्र काल मी तिच्या अफ्रिकेला जाण्याच्या पोस्ट पाहिल्या. जर ती अफ्रिकेला गेलीय तर माझा मुलगा कुठेय?” असा सवाल विचारत श्वेताने आमच्या मुलाला हॉटेलमध्ये एकट्याला ठेवल्याचा आरोप त्याने केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhinav Kohli (@abhinav.kohli024)

पुढे तो म्हणाला, “आताच पोलिस स्टेशनला गेलो होतो. मात्र फार उपयोग झाला नाही. त्यांनी सांगितलं चिल्ड्रन वेलफेअर कमिटीमध्ये जा. सगळीकडून उडवाउडवीची उत्तर मिळतं आहेत.मी फक्त माझ्या मुलाला शोधतोय. हॉटेलांमध्ये जाऊन त्याचा फोटो दाखवून माझा मुलगा इथे आहे का विचारत आहे. ती माझ्या मुलालासोडून गेली. तो एकटा खूप घाबरतो. माहित नाही तो कसा असेल.” असं अभिनव व्हिडीओत म्हणालाय.

या व्हिडीओतून अभिनवने मदत मागितली आहे. तो म्हणाला. “दोन दिवसांपासून माझा मुलगा आजारी आहे. पण अशा स्थितीतही श्वेता मुलालासोडून शोसाठी गेलीय.

या आधी श्वेता तिवारीने देखील अनेकदा अभिनव कोहलीवर विविध आरोप केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 2:01 pm

Web Title: shweta tiwari ex husband abhinav kohali allegation on shweta as she kept son alone in hotel kpw 89
Next Stories
1 ‘शर्म है या बेच दी’, बोल्ड ड्रेस परिधान करुन डान्स केल्यामुळे रश्मी देसाई झाली ट्रोल
2 मदर्स डे : आई बनल्यानंतर डिप्रेशनमध्ये होती अभिनेत्री कल्कि कोचलीन
3 ‘तू मला दिसत नाहीस’; आकाशाकडे बघत भावाच्या आठवणीत निक्की झाली भावूक
Just Now!
X