News Flash

अभिनव आणि श्वेता तिवारीच्या भांडणावर पूर्वाश्रमीच्या पतीची प्रतिक्रिया, म्हणाला..

श्वेताच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे नाव राजा चौधरी आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या श्वेता केप्टाउनमध्ये ‘खतरों के खिलाडी ११’चे चित्रीकरण करत आहे. ती सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी श्वेता आणि तिचा दुसरा पती अभिनव कोहली यांच्यामध्ये मुलगा रेयांशवरुन वाद झाला होता. अभिनवने श्वेतावर अनेक आरोप केले होते. आता श्वेताचा पूर्वाश्रमीचा पती राजा चौधरीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच राजाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. त्यावेळी तो श्वेता आणि तिचा पती अभिनवमध्ये सतत होणाऱ्या भांडणावर म्हणाला, ‘हो, श्वेता एक उत्कृष्ट आई आणि एक चांगली पत्नी आहे यात शंका नाही. हा केवळ एक योगायोग आणि तिचे दुर्दैव आहे की तिचे दुसरे लग्नही अयशस्वी ठरले. याचा अर्थ असा नाही की ती चुकीची आहे किंवा ती वाईट व्यक्ती आहे.’

आणखी वाचा : कोरिओग्राफर गीताने केले लग्न? व्हायरल झालेला फोटो पाहून म्हणाली..

राजा पुढे म्हणाला की श्वेताने अभिनवला त्याच्या मुलाला भेटण्याची परवानगी द्यावी. ‘श्वेताला समजायला हवे की तिच्या आणि अभिनवच्या आयुष्यात कोणत्याही समस्या असल्या तरी एक वडील आपल्या मुलाचे किंवी मुलीचे कधीही नुकसान करीत नाही’ असे तो म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raja Chaudhary (@rajachaudhary)

श्वेताने अभिनवशी लग्न करण्यापूर्वी राजाशी लग्न केले होते. मात्र त्यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. पलक ही श्वेता आणि राजाची मुलगी आहे. मार्च महिन्यात राजा तिला भेटला होता. जवळपास १३ वर्षांनंतर राज आणि पलकची भेट झाली होती. त्यावेळी त्याने सोशल मीडियावर तिच्या सोबतचे काही फोटो शेअर केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 12:50 pm

Web Title: shweta tiwari ex husband raja chaudhary says her second marriage failed as well avb 95
Next Stories
1 Khatron Ke Khiladi 11 : आणखी एक कंटेस्टेंट आऊट ! पुन्हा एकदा ‘बिग बॉस’ एक्स कंटेस्टेंटचा पत्ता कट !
2 वाढदिवशी ज्युनिअर एनटीआरकडून चाहत्यांना भेट, ‘RRR’मधील लूक प्रदर्शित
3 ‘IPL बंद झाल्याचा राग इंडियन आयडलवर काढतात’, आदित्य नारायणने व्यक्त केली खंत
Just Now!
X