News Flash

“श्वेता मुलाला एकटं टाकून आफ्रिकेला गेली”, अभिनवच्या आरोपांवर श्वेता तिवारी संतापली

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्वेताने अभिनवच्या आरोपांना खोटे ठरवले आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. श्वेताचं दुसऱं लग्न मोडल्यानंतर पती अभिनवने तिच्यावर अनेक आरोप लावले आहेत. श्वेता लवकरच ‘खतरों के खिलाडी’च्या ११ व्या पर्वात दिसणार आहे. यासाठी ती दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन शहरात गेली. त्यानंतर अभिनवने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करतं “माझा मुलगा रेयांशला सोडून ती गेली आहे. मी फक्त माझ्या मुलाला शोधतोय. हॉटेलांमध्ये जाऊन त्याचा फोटो दाखवून माझा मुलगा इथे आहे का विचारत आहे. तो एकटा खूप घाबरतो. माहित नाही तो कसा असेल”, असा आरोप अभिनवने केला. दरम्यान, आता श्वेताने त्याला उत्तर दिले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्वेता म्हणाली, “मी अभिनवला फोनवर सांगितले होते की मी केप टाऊनला जात आहे आणि रेयांश त्याच्या कुटुंबासोबत पूर्णपणे सुरक्षित आहे. माझी आई, नातेवाईक आणि माझी मुलगी पलक त्याची काळजी घेत आहेत. मी शूटमधून वेळ काढून नेहमीच रेयांशसोबत व्हिडीओ कॉलवर बोलते. मी अभिनवला सगळ्यागोष्टी चांगल्याप्रकारे समजावून सांगितल्या होत्या. पण, अभिनवने व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर मला धक्का बसला.”

श्वेता पुढे म्हणाली, “अभिनव हे का करतो यामागचा त्याच्या अजेंडा मला समजत नाही. हायकोर्टच्या आदेशानंतर अभिनव दररोज संध्याकाळी एक तास रेयांशशी बोलतो. हायकोर्टाने तर अर्ध्या तासाची परवानगी दिली आहे, परंतु अभिनव बोलतो की मला आणखी थोडावेळ दे म्हणून मी एक तासा बोलू देते. तरीही जर तो असं म्हणत असेल की त्याचा मुलगा कुठे आहे. हे कसं ते माहित नाही आणि यावर काय बोलता येईल.”

ती पुढे म्हणाली, “मी केपटाऊनला रेयांश, त्याची आया आणि आईला सोबत आणलं असतं, पण अभिनवने यासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही किंवा सहमती दिली नाही. मी रेयांनशच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहे. तर, दुसरीकडे अभिनव मुलांच्या खर्चासाठी एक पैशाची मदत करत नाही.”

काय म्हणाला अभिनव?

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhinav Kohli (@abhinav.kohli024)

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhinav Kohli (@abhinav.kohli024)

अभिनव या व्हिडीओत म्हणाला, “श्वेता खतरो के खिलाडीसाठी साउथ अफ्रिकेला गेलीय. काही दिवसांपूर्वीच तिने रेयांशला घेऊन शोसाठी अफ्रिकेला जाण्यासाठी विचारलं होतं. मात्र काल मी तिच्या अफ्रिकेला जाण्याच्या पोस्ट पाहिल्या. जर ती अफ्रिकेला गेलीय तर माझा मुलगा कुठेय?” असा सवाल विचारत श्वेताने आमच्या मुलाला हॉटेलमध्ये एकट्याला ठेवल्याचा आरोप त्याने केलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 1:09 pm

Web Title: shweta tiwari hits back at abhinav kohli claims and says not contribute a single penny for his child dcp 98
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्याने अभिषेक चाहत्याला म्हणाला, “कुणीही त्यांच्यापेक्षा..”
2 “आईमुळे ‘ही’ गोष्ट शिकले”, ‘असं’ आहे आई आणि माऊचं नातं
3 अनिरूद्ध दवेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ; केली करोनावर मात
Just Now!
X