News Flash

वयाच्या चाळीशीतही इतकी फिट? या अभिनेत्रीचे अॅब्स पाहिलेत का?

श्वेताने बरंच वजन कमी केलं आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या लूक्सने आणि अदाकारीने आपल्या चाहत्यांचं मन जिंकत असते. ती सोशल मीडियावर सतत काही ना काहीतरी शेअर करत असते. नुकतीच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये ती तिचे अॅब्स दाखवत आहे.

हा फोटो शेअर करताना श्वेता म्हणते, माझ्याकडे कोणतीही डेडलाईन नाही. मी एक एक किलो कमी करत आहे पण मी एक दिवस माझं ध्येय प्राप्त करेनच. श्वेताने यापूर्वीही तिचा फिटनेस दाखवणारे फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांसह अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या.

श्वेताने आपलं वजन बरंच कमी केलं आहे. याबद्दल एका पोस्टमध्ये ती म्हणते, वेट ल़ॉस करणं इतकं सोपं नाही. हे खूप अवघड काम आहे. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. स्वतःवर नियंत्रण आणि प्रचंड इच्छाशक्ती लागते. पण वजन कमी करणं अशक्य नाही. तुमच्याकडे योग्य मार्गदर्शक असेल तर ते शक्य आहे.

श्वेता वयाच्या चाळीशीत आहे. तरीही ती एवढी फिट आहे. आपल्या चाहत्यांमध्ये ती याच गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते आणि आपले वेगवेगळे फोटोज शेअर करत असते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 8:04 pm

Web Title: shweta tiwari lost weight showed abs to fans vsk 98
Next Stories
1 ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता मराठीत; “गोकुळधामची दुनियादारी”ला चाहत्यांची पसंती
2 ७ वर्षाच्या मुलासोबत अभिनेत्रीने शेअर केला न्यूड फोटो; कोर्टाने सुनावली कारावासाची शिक्षा
3 आधी लगीन पिंपळाशी मग अभिषेकशी, लग्नाआधी ऐश्वर्याने केले का हे विधी?
Just Now!
X