News Flash

श्वेता तिवारीने शेअर केला CCTV फुटेजचा ‘तो’ व्हिडीओ; “हा शारीरिक अत्याचार नाही मग काय?”

श्वेता आणि अभिनवमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

(Photo credit : abhinav kohli instagram and shweta tiwari instagram)

अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून श्वेता तिवारी आणि तिचा पती अभिनव कोहली यांच्यात वाद सुरू आहेत. श्वेता मुलगी पलक आणि मुलगा रेयांश यांचा सांभाळ करतेय. मात्र श्वेताने मुलाला आपल्या ताब्यात द्यावं यासाठी अभिनवची धडपड सुरू आहे. श्वेता तिवारी ‘खतरो कें खिलाडी’ या शोसाठी केपटाउनला गेल्यानंतर अभिनव कोहलीने श्वेता मुलाला एकटं टाकून गेली असा आरोप केला.

श्वेता आणि अभिनवमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अभिनव त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत श्वेतावर आरोप करत असतानाच आता श्वेताने देखील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. श्वेता तिवारीने एका सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. श्वेता मुलाला भेटू देत नाही असे आरोप अभिनवने कायम केले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत “मी अभिनवला रेयांशला का भेटू देत नाही” यामागंचं कारण तिने स्पष्ट केलंय.

श्वेताने शेअर केलेला एक व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेजचा आहे. यात श्वेताने मुलाला उचलून घेतल्याचं दिसतंय. तर अभिनव तिच्याकडून मुलाला खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय. श्वेता मुलाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतेय. ती जमिनिवर पडते. मात्र तरिही अभिनव मुलाला खेचून घेतो असं दिसतंय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ती म्हणालीय, ” आता सत्य समोर आलं पाहिजे. ( मात्र हे मात्र अकाऊंटवर जास्त वेळ राहणार नाही. मी नंतर डिलीट करून टाकेन. मी हे आचा यासाठी पोस्ट करत आहे जेणेकरून सत्य समोर येईल.) माझा मुलगा अभिनवला का घाबरतो त्याचं कारण हे आहे.” असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला. श्वेताने व्हिडीओ शेअर केल्यानंतर इन्स्टाग्रामने मात्र व्हिडीओ ब्लॉग केला आहे. संवेदनशील कंटेंट असल्याचं म्हणत व्हिडीओ ब्लॉग करण्यात आलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

पुढे ती म्हणाली, “या घटनेनंतर माझा मुलगा महिनाभर घाबरत होता. जो इतका घाबरला की रात्री नीट झोपतही नव्हता. त्याचा हात दोन आठवडे दुखत होता. आता तो वडिलांना भेटायलाही घाबरतो. मी माझ्या मुलाला या मानसिक त्रासाचा सामना करू देणार नाही. मी त्याला पूर्णपणे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतेय. मात्र हा भयानक व्यक्ती माझ्या मुलाचं मानसिक आरोग्य खराब करतोय. हा शारीरिक अत्याचार नाही मग काय आहे? हे माझ्या बिल्डिंगचं सीसीटीव्ही फुटेज आहे.” तर दुसऱ्या व्हिडीओत तिचा मुलगा घाबरल्याचं दिसतंय.

वाचा: “पैसे पचवतेस ही आणि म्हणते…” श्वेता तिवारीच्या आरोपांवर अभिनव म्हणाला…

मुलाचा ताबा मिळावा यासाठी अभिनवचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र श्वेताचा याला पूर्णपणे विरोध आहे. अभिनव मुलाचा योग्यप्रकारे सांभाळ करू शकत नाही असं तिचं म्हणणं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 9:05 am

Web Title: shweta tiwari share cctv video on social media shows abhinav snatch child from shweta kpw 89
Next Stories
1 Corona Crisis: मी काय केलं? ऐकाच! अमिताभ बच्चन यांनी टीकाकारांना दिला खणखणीत जवाब
2 Video: “कलाकार म्हणून ग्लॅमरस आणि बोल्ड होणं गरजेचं”, मोनालिसा बागलचा खुलासा
3 “माझ्या नव्या बायकोला भेटा”; अभिनेता विजय वर्माच्या पोस्टवर आयुष्यमान म्हणाला..
Just Now!
X