News Flash

श्वेता तिवारीचा फिटनेस मंत्र; मायलेकीच्या वर्कआउटचा व्हिडीओ व्हायरल

श्वेता तिवारीला २० वर्षांची मुलगी असूनही श्वेता आजही खूप फिट आहे.

(Photo-Instagram@sahilrasheed)

अभिनेत्री श्वेता तिवारी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्वेता तिच्या अभिनयासोबत गेल्या काही दिवसांपासून तिच्या फिटनेसमुळे चांगलीच चर्चेत आहे. तर श्वेताची मुलगी पलक देखील सोशल मीडियवर सक्रिय असून पलक ग्लॅलरस फोटो शेअर करत असते. ४० वर्ष वय असलेल्या श्वेता तिवारीला २० वर्षांची मुलगी असूनही श्वेता आजही खूप फिट आहे. श्वेता आणि पलक दोघींचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. या मायलेकींच्या फोटोंना नेटकऱ्यांकडून मोठी पसंती मिळताना दिसते.

नुकताच श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओत श्वेता आणि पलक वर्कआउट करताना दिसत आहेत. या वर्कआउटच्या व्हिडीओत श्वेता आणि पलक दोघीही मोठ्या मेहनतीने वर्कआउट करताना दिसत आहेत. या व्हीडीओतील श्वेताचा उत्साह आणि एनर्जी पाहून चाहते थक्क झाले आहेत. श्वेता मुलगी पलकला टक्कर देताना दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sahil Rasheed (@sahilrasheed)

हे देखील वाचा: Raj Kundra Porn case: विनाकारण उमेश कामतला मन:स्ताप; खात्री न करता वापरला त्याचा फोटो

साहिल राशिद या फिटनेस ट्रेनरने श्वेता आणि पलकचा हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडीओत श्वेता आणि पलक रोप वर्कआउट करत असल्याचं दिसून येतंय. यात त्या एकमेकींची मदत करत आहेत. हा व्हीडीओ शेअर करत साहिलने कॅप्शनमध्ये “जशी आई तशी मुलगी” असं म्हंटलं आहे.

लवकरच श्वेता तिवारी ‘खतरों के खिलाडी’ या स्टंट शोमध्ये झळकणार आहे. या शोमध्ये श्वेता अनेक स्टंट करताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 12:48 pm

Web Title: shweta tiwari workout with daughter palak video goes viral on social media kpw 89
Next Stories
1 शाहरुख खानच्या पुढच्या चित्रपटात साउथची नयनतारा हिचं नाव कन्फर्म; चित्रपटाच्या तयारीला सुरूवात
2 ‘१०० टक्के नाचायला येणार’, मनसेच्या दहीहंडिला प्रविण तरडेचा पाठिंबा
3 Raj Kundra Porn case: विनाकारण उमेश कामतला मन:स्ताप; खात्री न करता वापरला त्याचा फोटो
Just Now!
X