News Flash

इंटिमेट सीन देण्यासाठी मला मुलीनेच प्रोत्साहन दिलं

एका मुलाखतीमध्ये श्वेता तिवारीने हा खुलासा केला आहे

रुपेरी पडद्यावर इंटिमेट सीन देणे ही सोपी गोष्टी नाही. हा सीन देण्यासाठी अभिनेत्रींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आजकाल असे सीन्स केवळ चित्रपटांपूरता मर्यादित न राहता मालिका किंवा वेब सीरिजमध्ये देखील पाहायला मिळतात. नुकताच अभिनेत्री श्वेता तिवारीने देखील तिच्या आगामी वेब सीरिजमध्ये असाच एक सीन दिला आहे. हा तिच्या संपूर्ण करिअरमधील पहिला इंटिमेट आणि किसिंग सीन आहे. पण या सीनचे चित्रीकरण करणे श्वेतासाठी फार कठीण होते.

छोट्या पडद्यावरील ‘कसौटी जिंदगी की’ या एकता कपूरच्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली श्वेता एका नव्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजचे नाव ‘हम तुम अ‍ॅड देम’ असून श्वेतासह अभिनेता अक्षय ओबेरॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजमध्ये श्वेता आणि अक्षयने इंटिमेट आणि किसिंग सीन दिले आहेत.

नुकताच श्वेताने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे इंटिमेट सीन देणे कठीण असल्याचे सांगितले. ‘जेव्हा या सीरिजचा प्रमो प्रदर्शित करण्यात आला तेव्हा मी थोडी घाबरले होते. मी सीरिज निर्मात्यांना फोन केला आणि विचारले हे काय आहे? मला ट्रेलर आवडला नाही. मला कळत नव्हते आईला, कुटुंबीयांना आणि मित्र परिवाराला हा ट्रेलर कसा दाखवू. नंतर मी माझ्या मुलीला ट्रेलर दाखवला आणि तिचे मत विचारले’ असे श्वेता म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

आणखी वाचा : हिंमत असेल तर ये.. कपिल शर्माचे अक्षयला चॅलेंज

श्वेताची मुलगी पलकची प्रतिक्रियापाहून श्वेतादेखील आश्चर्यचकित झाली. ‘माझी मुलगी म्हणाली आई ट्रेलर खूप मस्त आहे. त्यानंतर मी ट्रेलर शेअर केला आणि निर्मात्यांची फोन करुन माफी मागितली’ असे श्वेता पुढे म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2019 10:33 am

Web Title: shweta tiwaris daughter palak encouraged her to do intimate scenes with akshay oberoi avb 95
Next Stories
1 Birthday Special : ‘मिस आशिया’चा किताब पटकावणारी ही अभिनेत्री करायची कंपनीमध्ये काम
2 प्रदर्शनापूर्वीच ‘दबंग ३’ ठरतोय हिट, कमावले तब्बल इतके कोटी
3 ही गोंडस मुलगी आहे आजची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री
Just Now!
X