News Flash

‘दंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टार’साठी दिली होती ऑडिशन आणि झाली ‘मिर्झापूर’ची ‘गोलू’

अनेक शोज आणि चित्रपटांमध्ये सध्या करत आहे काम...

मिर्झापूर या वेबसीरीजमध्ये गोलू ही महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता त्रिपाठी शर्मा. श्वेताने अनेक चित्रपट, शोजमध्ये काम केलं आहे आणि तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर आफलं वेगळं स्थानही निर्माण केलं आहे. तिने आपल्या एका मुलाखतीत काही खुलासे केले आहेत.

ती म्हणाली, “मला बऱ्याचदा लोक म्हणतात हा चित्रपट नायिकाकेंद्री आहे, मध्यवर्ती भूमिका आहे, चित्रपट महोत्सवातला चित्रपट आहे. त्यांना वाटलं असं बोललो तर मी कुठल्याही सिनेमाला शोला हो म्हणेन मग तो माझ्यासाठी असेल किंवा नसेल.”

तिने सांगितलं की, तिला कायम स्त्रीकेंद्री भूमिकेच्या ऑफर्स येतात. तिने आमिर खानच्या दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटांसाठीही ऑडिशन दिली होती. तिची अशी इच्छा आहे की माझ्यावर अशी वेळ यावी की मला वेळ नाही म्हणून माझ्यावर एखादा शो किंवा चित्रपटाला मनाई करण्याची वेळ यावी.

तिने या मुलाखतीत सांगितलं, “मला जर एखाद्या भूमिकेतून शिकायला मिळत नसेल तर मी ती भूमिका करत नाही. मी दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार साठी ऑडिशन दिली होती. पण मला ती भूमिका नाही मिळाली. पण ज्यांनी ती निभावली त्यांनी खरंच खूप चांगलं काम केलं आहे. त्यांना सलाम!”

श्वेताने हेही सांगितलं, “मला वकील व्हायचं होतं. पण कदाचित काहीतरी वेगळंच नशिबात होतं. मला समाजात बदल घडवण्यासाठी वकील व्हायचं होतं पण आता मी कालाकार बनूनही करू शकते. तुम्हाला ज्या गोष्टींवर विश्वास असतो, त्या गोष्टी तुम्हाला भूमिकेतून दाखवता येत असलेलं चांगलं.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 5:17 pm

Web Title: shweta tripathi sharma auditioned for dangal and secret superstar vsk 98
Next Stories
1 बापरे! भर स्टेजवर अभिनेत्रीने उतरवले कपडे
2 अली जफरवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला तीन वर्षांचा तुरुंगवास
3 कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात एफआयआर दाखल; कथाचोरीचा आरोप
Just Now!
X