News Flash

माझा पगार ऐकून सलमान सरांना धक्काच बसला, मग…

सिद्धार्थ सध्या अलादीन: नाम तो सुना होगा या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

अभिनेता सिद्धार्थ निगम, मुर्ती लहान आणि किर्ती महान म्हणून ओळखला जातो. सिद्धार्थने लहान वयातच आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली. सिद्धार्थ सोशल मीडियावर सक्रिय असून तो फिटनेसचे अनेक व्हिडीओ शेअर करताना दिसतो. त्याचे हे व्हिडीओ अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. पण आता एका वेगळ्या कारणासाठी तो चर्चेत आला आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये सलमान खानने त्याचा पगार वाढवण्यासाठी मदत केल्याचे सांगितले आहे.

नुकतीच सिद्धार्थने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानमुळे त्याचा पगार वाढला होता असे सांगितले. “जेव्हा मी कर्जतमध्ये अशोका मालिकेचे शूटिंग करत होतो तेव्हा सलमान सरांशी माझे चांगले मैत्रीचे नाते तयार झाले होते. ते सुलतान आणि आणखी एका चित्रपटाचे चित्रीकरण तेथे करत होते. मी त्यांच्या जिममध्ये वर्कआऊट करायचो आणि त्यांच्यासोबत जेवलासुद्धा बसायचो” असे तो म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth Nigam (@thesiddharthnigam)

पुढे तो म्हणाला, ‘आम्ही एकत्रच वर्कआऊट करायचो. मी अशोकासाठी काम करत असताना एकदा सलमान सरांनी मला माझ्या एका दिवसाच्या पगाराबद्दल विचारले होते आणि ते ऐकून त्यांना धक्का बसला होता. त्यावेळी मला दिवसाला खूपच कमी पगार मिळायचा. त्यांनी एका व्यक्तीला फोन केला आणि त्याला सांगितले की मला खूप कमी पगार दिला जात आहे. मी अशोका मालिकेसाठी जवळपास एक वर्ष काम करत होतो. पण त्यांचे बोलण झाल्यानंतर अचानक माझ्या पगारात वाढ झाली होती” असे सिद्धार्थ म्हणाला.

सिद्धार्थने एका जाहिरातीमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या ‘धूम ३’ चित्रपटात आमिरच्या बालपणीची भूमिका साकारली होती. सिद्धार्थ आणि अभिनेता टायगर श्रॉफ या दोघांना अनेक वेळा एकत्र वर्कआऊट करताना पाहिले जाते. सिद्धार्थ सध्या ‘अलादीन: नाम तो सुना होगा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 6:45 pm

Web Title: siddhart nigam talked about how salman khan helped him in salary hike dcp 98 avb 95
Next Stories
1 ‘तुझं माझं जमतंय’फेम रोशन विचारेची सोशल मीडियावर चर्चा
2 मुन्नाभैय्या शेतकऱ्याच्या रुपात; ‘या’ चित्रपटात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
3 ‘आव्हानात्मक भूमिका साकारायला मला आवडतं’, तुझं माझं जमतंय मालिकेतील अभिनेत्याचा खुलासा
Just Now!
X