03 March 2021

News Flash

सिद्धार्थ-मितालीच्या घरी लग्नाची लगबग; पाहा ग्रहमखाचे खास फोटो

सिद्धार्थने शेअर केले ग्रहमखाचे फोटो

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक लोकप्रिय जोड्यांनी साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत. यामध्येच आता मराठी कलाविश्वातील चर्चेत राहणारी मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर ही जोडी लग्नगाठ बांधणार आहे. सध्या या दोघांच्या घरी लग्नापूर्वीच्या विधी, सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. याचे काही फोटो सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून सिद्धार्थ आणि मिताली यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. त्यातच या दोघांनी त्यांच्या केळवणाचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे प्रत्येक चाहत्याला त्यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत. यामध्येच आता या दोघांच्याही घरी लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.


सिद्धार्थच्या घरी नुकताच ग्रहमखाचा कार्यक्रम पार पडला असून यावेळी त्याची सोड मुंजदेखील करण्यात आली आहे. या कार्यक्रमातील फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. “सोड मुंज झाली. आता जातो काशीला. ओके बाय. #grahmak”, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

२०१९ मध्ये सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा पार पडला. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. नवीन वर्षात लग्नगाठ बांधत सिद्धार्थ आणि मिताली आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 2:43 pm

Web Title: siddharth chandekar and mitali mayekar enjoy their pre wedding ritual grahmakh ssj 93
Next Stories
1 ‘तांडव’बाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजू श्रीवास्तव नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
2 ‘मिर्झापूर-2’ मागील वादाचं ग्रहण कायम; सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस
3 सुशांतच्या वाढदिवशी कंगनानं यशराज, महेश भट्ट, करण जोहरवर साधला निशाणा
Just Now!
X