01 March 2021

News Flash

रंग माळियेला… मिताली-सिद्धार्थच्या लग्नाचा टीझर व्हिडीओ व्हायरल

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर २४ जानेवारी रोजी लग्न बंधनात अडकला. त्याने अभिनेत्री मिताली मयेकरशी लग्न केले. त्यांचा लग्नसोहळा पुण्यातील ढेपे वाडा येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता त्यांच्या लग्नाचा टीझर व्हिडीओ समोर आला आहे.

सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. त्यांच्या लग्नसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या कलारांनी देखील सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaatha (@gaatha.co.in)

आता मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नाचा टीझर व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. टीझरमध्ये सिद्धार्थ आणि मिताली अतिशय आनंदी दिसत आहेत. मितालीने हिरव्या रंगीची साडी नेसली असून ती या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. सध्या हा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

दोन वर्षांपूर्वी मिताली आणि सिद्धार्थने व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्या दोघांनी साखरपूडा केला होता. आता पुण्यातील ढेपे वाडा येथे २४ जानेवारी लग्नबंधनात अडकले. त्यावेळी तेथे सई ताम्हणकर, पूजा सावंत, भूषण प्रधान, अभिज्ञा भावे आणि इतर काही कलाकार हजेरी लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 3:04 pm

Web Title: siddharth chandekar and mitali mayekar wedding teaser video viral avb 95
Next Stories
1 “माझी चूकच झाली, अण्णा हजारेंना पाठिंबा दिला”, दिग्दर्शकाचे ट्वीट चर्चेत
2 प्रिती आणि राणीच्या मैत्रीमध्ये ‘या’ कारणामुळे पडली होती फूट
3 कतरिनामुळे माझ्या करिअरवर परिणाम झाला, झरीन खानचा आरोप
Just Now!
X