करोना व्हायरसचा प्रसार रोखता यावा यासाठी सरकारने २१ दिवसांसाठी लॉकडाउन घोषित केला आहे. सर्व शूटिंग अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच कलाकार घरी बसले आहेत. लॉकडाउनच्या काळात घरी बसून काय करावं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर अभिनेता सिद्धार्थ जाधव याने नुकतीच टिकटॉक या अॅपवर स्वत:चा अकाऊंट उघडला आहे. सिद्धार्थने टिकटॉकवर स्वत:चा एक मजेशीर व्हिडीओसुद्धा पोस्ट केला आहे.

टिकटॉकवर एंट्री करताच सिद्धार्थने पहिला व्हिडीओ पत्नीसोबत शूट केला आहे. या व्हिडीओत त्याला ‘Wife चं फुलफॉर्म काय असतं’ असा प्रश्न विचारला जातो. त्यावर तो म्हणतो, ‘without information fight every time’ म्हणजेच कुठलीही माहिती न घेता सतत भांडत राहणे. सिद्धार्थ हा डायलॉग बोलताच नंतर पत्नीकडे कॅमेरा फिरवतो. तिने ऐकलंय हे समजताच तो घाबरतो.

आणखी वाचा : ‘काही शब्द ब्रह्मांडातून गायबच झालेत’; प्रसाद ओकची भन्नाट पोस्ट

सिद्धार्थने इन्स्टाग्राम अकाऊंटवरही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या विनोदी अभिनयाने हसवणारा सिद्धार्थने आता टिकटॉकच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे.