News Flash

सिध्दार्थचे सामाजिक भान, बीडच्या अनाथ मुलांना केली आर्थिक मदत

सामाजिक भान मनात ठेवून सलमान खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, नाना पाटेकर यांच्यासारखे बॉलिवूडचे कलाकार अनेक समाजोपयोगी कामं करत असतात.

सामाजिक भान मनात ठेवून सलमान खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, नाना पाटेकर यांच्यासारखे बॉलिवूडचे कलाकार अनेक समाजोपयोगी कामं करत असतात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता सिद्धार्थ जाधवने देखील काही अनाथ मुलांना मदत केली आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात सिध्दार्थने बीडच्या सहारा अनाथालयाच्या निराधार मुलांच्या चेह-यावरही आनंद फुलवण्यासाठी धनराशी भेट दिली आहे. या अनाथालयामध्ये ८५ मुले राहतात.

गेल्या १४ वर्षापासून सहारा अनाथलायाची स्थापना करून अनेक उपेक्षित, आणि वंचित मुलांना घर मिळवून देणा-या संतोष गर्जेचा त्याच्या सामाजिक कामासाठी अभिनेता सिध्दार्थ जाधवच्या हस्ते एका कार्यक्रमात नुकताच सत्कार करण्यात आला. तेव्हा संतोषने मनमोकळं करताना आपली आत्मकथा आणि निराश्रीत मुलांची व्यथा सांगताच भावूक होऊन सिध्दार्थने सर्वांसमक्ष धनराशी देण्याचे जाहीर केले.

यावेळी सिद्धार्थ म्हणाला की, ‘बीडच्या पाटसरा ह्या दुर्गम खेड्यातल्या गरीब उसतोडणी कामगाराच्या घरात जन्मलेल्या संतोषचा मला अभिमान आहे. वयाच्या १९ व्या वर्षापासून तो अनाथ आणि उपेक्षित मुलांसाठी काम करतो. त्याच्या सहारा अनाथालयात ८५ निराधार मुलं आहेत. ह्या मुलांसाठी मी खारीचा वाटा उचलला. इतकेच म्हणेन. जी मी धनराशी दिली, ती संतोषच्या कार्यापूढे फार छोटी होती.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 10:05 am

Web Title: siddharth jadhav donates money to 85 orphans
Next Stories
1 कतरिना म्हणतेय, गेल्या दहा वर्षांत एकानंही मला डेटसाठी विचारलं नाही
2 पॅडेड की पुशअप: हंगामा प्लेची पहिली मराठी विनोदी वेब-सीरिज तुम्हाला खुश करेल
3 पाहुण्यांना मनसोक्त नाचता यावं म्हणून प्रियांकानं लढवली ही शक्कल!
Just Now!
X