प्रत्येक कलाकाराला त्याच्या प्रत्येक सिनेमा आणि त्याची व्यक्तिरेखा ही वेगळी असावीच असेच वाटत असते. कारण कोणताही सिनेमा हा एकदाच बनतो. त्यामुळे त्यातली व्यक्तिरेखा पूर्णपणे जगण्याचा ती लोकांना आवडेल याप्रमाणे निभवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. याला मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवही अपवाद नाही.

‘माणूस एक माती’ या आपल्या आगामी सिनेमातही सिद्धार्थ एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. सिद्धार्थने या सिनेमातला त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. दाढी केस वाढलेला आणि शुन्याकडे नजर असलेला असा सिद्धार्थ आपल्याला माणूस एक माती या सिनेमाच्या पोस्टरवर पाहायला मिळतो.

याआधीही सिदधार्थने अनेक सिनेमात वेगवेगळे लूक केल्याचे दिसले आहे. सध्या त्याचे गाजत असलेले नाटक म्हणजे गेला उडत या नाटकामध्येही त्याचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळतो. आता या आगामी सिनेमात सिदधार्थला त्याचे चाहते स्वीकारतील का हे तर आपल्याला लवकरच समजेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश शंकर झाये यांनी केले आहे. तसेच या सिनेमाची निर्मिती शआरदा विजयकुमार खरात यांनी केली आहे. येत्या २४ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सुरेश झाडे यांनी केले आहे. तसेच या सिनेमात सिदधार्थ सोबत अभिनेत्री रुचिता जाधवही पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, नुकताच गेला उडत या नाटकाचा १०० वा प्रयोग पार पडला. यावेळी गेला उडतचे निर्माते प्रसाद कांबळी यांनी या नाटकासंबंधी एक किस्सा सांगितला. ‘आमचा प्रयोग नांदेडला होता. त्यावेळी सिद्घार्थच्या मोठय़ा भावाची भूमिका करणाऱ्या गणेश जाधवला डेंग्यू झाल्याचे समजले. त्याच्यासहित आमचेही हातपाय गळाले. काय करायचे काहीच सुचेना. पण त्या परिस्थितीतही गणेशने कसलीही तमा न बाळगता तो प्रयोग केला. तो जर उभा राहिला नसता तर हा प्रयोग होऊच शकला नसता’.