News Flash

सिद्धार्थ जाधवच्या रॅप साँगचा ‘लाव रे तो व्हिडिओ’

या कार्यक्रमामुळे अनेकांना घरातूनच आपले कौशल्य सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले.

सिद्धार्थ जाधव

‘लाव रे तो व्हिडीओ’ हा एक आगळावेगळा, जबरदस्त कार्यक्रम झी युवा वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली. या कार्यक्रमामुळे अनेकांना घरातूनच आपले कौशल्य सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले. या शोमध्ये कल्पित प्रतिभेला टेलीव्हिजनवर प्रदर्शित करण्याची संधी मिळते. लाव रे तो व्हिडीओचा निवेदक निलेश साबळे म्हणतो, “हे मोबाईलचे जग आहे आणि आम्ही मोबाईलला दूरदर्शनशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.” या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये सोनाली कुलकर्णी यांनी निलेश साबळे यांना सेलिब्रिटी परीक्षक म्हणून मदत केली. पण नुकत्याच झालेल्या भागात सिद्धार्थ जाधव प्रेक्षकांच्या भेटीस आला.

सिद्धार्थ जाधव त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी आणि त्याच्या कमाल विनोदबुद्धीसाठी प्रसिद्ध आहे. पण त्याचसोबत सिद्धार्थ रॅप करू शकतो हे कोणाला माहित नव्हतं. लाव रे तो व्हिडीओच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात सिद्धार्थ जाधवने रंपाट या चित्रपटातील रॅप साँग सादर केलं. इतकंच नव्हे तर उत्तम प्रकारे सादर केलेल्या रॅप साँगमुळे सिद्धार्थने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन देखील केलं. सिद्धार्थचा हा नवा पैलू या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांसमोर आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 6:09 pm

Web Title: siddharth jadhav rap song in laav re to video ssv 92
Next Stories
1 ‘टकाटक’मधील ‘या’ बोल्ड गाण्याने मोडले विक्रम
2 “‘गँग्स ऑफ वासेपूर’साठी मी माझं पूर्ण मानधन गमावलं”; अनुराग कश्यपचा रिचाला पाठिंबा
3 करोना संकटामुळे रश्मी देसाईचं ‘हे’ स्वप्न राहिलं अपूर्ण
Just Now!
X