News Flash

भाजपाकडून खून, बलात्काराच्या धमक्या; अभिनेत्याने पोलीस संरक्षण घेण्यास दिला नकार

जाणून घ्या कारण...

sidharth narayana,

दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्याला शिव्यांचे फोन तसेच जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे आरोप केले होते. त्यानंतर पोलिसांनी सिद्धार्थला संरक्षण दिले. पण त्याने पोलीस संरक्षण घेण्यास नकार दिला आहे.

सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पोलिसांचे आभार मानले आहेत. ‘संरक्षण दिल्याबद्दल तामिळनाडू पोलिसांचे मनापासून आभार. मी माझ्या कुटुंबातील पहिला व्यक्ती असेल, ज्याला पोलिसांनी संरक्षण दिले आहे. पण मी विनम्रतेने हे संरक्षण नाकारतो. जेणे करुन या महामारीच्या काळात त्याच अधिकाऱ्यांचा वेळ आणखी कशासाठी तरी वापरला जाऊ शकेल. तुम्हा सर्वनांचे आभार’ या आशयाचे ट्वीट त्याने केले आहे.

आणखी वाचा : ‘ती पुढे निघून गेली आणि मी…’, नेहा कक्करच्या एक्स बॉयफ्रेंडचा खुलासा

गुरुवारी सिद्धार्थने ट्वीट करत त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना भाजपाकडून खून आणि बलात्काराच्या धमक्या येत असल्याचे सांगितले होते. “भाजपा कार्यकर्त्याने माझा फोन नंबर लीक केला होता. गेल्या २४ तासात मला आणि माझ्या परिवाराला ५००हून अधिक बलात्काराच्या आणि मारुन टाकण्याच्या धमक्या आल्या आहेत. सगळे नंबर त्यांच्या भाजपा कनेक्शन आणि डीपीसहीत मी रेकॉर्ड करुन ठेवले आहेत आणि आता ते पोलिसांकडे देत आहे. मी शांत बसणार नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा” असे त्याने ट्वीटमध्ये म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 3:00 pm

Web Title: siddharth narayana refused police protection after being threatened with death avb 95
Next Stories
1 कंगना रणौतचं डिजिटल विश्वात पदार्पण, ‘मणिकर्णिका फिल्मस्’चा लोगो लॉन्च
2 ‘न्यूड सीन देण्यास माझा नकार नाही, पण…’, नेहा पेंडसेचा खुलासा
3 “सोनू सूद निवडणुकीत उभा राहीला तर…!”
Just Now!
X