News Flash

“तिला कामच करायचं नाहीये”; शिल्पा शिंदेच्या आरोपांवर अभिनेत्याचं प्रत्युत्तर

अभिनेत्रीने सुनील ग्रोवरसोबत काम करण्यास दिला नकार

अभिनेत्री शिल्पा शिंदे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी ती सुनील ग्रोवरच्या ‘गॅग्स ऑफ फिल्मीस्तान’ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये कलाकारांचं मानसिक शोषण केलं जातं, असा आरोप करत तिने या शोला रामराम ठोकला. परंतु तिच्या आरोपांवर अभिनेता सिद्धार्थ सागर याने प्रत्युत्तर दिलं आहे. “सहकलाकारांवर आरोप करण्याची वाईट सवय तिला आहे. आरोप करुन तिला काय मिळतं माहित नाही.” असा उपरोधिक टोला सिद्धार्थने लगावला आहे.

“खूप उडत होते, आता शांत झाले”; सुशांत प्रकरणावर कृष्णा अभिषेकने दिली प्रतिक्रिया

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने शिल्पा शिंदेच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “‘गॅग्स ऑफ फिल्मीस्तान’ हा एक खूप चांगला शो आहे. शोचे निर्माते कलाकारांना खूप चांगला पाठिंबा देतात. इतर ठिकाणी कलाकारांकडून १८ ते २० तास काम करुन घेतलं जातं. परंतु या ठिकाणी आम्ही केवळ १२ तास काम करतोय. परंतु शिल्पाला कदाचित तेवढं देखील काम करण्याची इच्छा नाही. तिला लोकांवर उगाचच आरोप करण्याची सवय आहे. आरोप करुन तिचा काय फायदा होतो माहित नाही.”

घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेवरुन अनुराग कश्यपचा केंद्राला टोला; म्हणाला…

यापूर्वी काय म्हणाली होती शिल्पा शिंदे?

‘भाभीजी घर पर है’ या विनोदी मालिकेतून नावारुपास आलेल्या शिल्पा शिंदेने शोच्या निर्मात्यांविरोधात संताप व्यक्त केला होता. “निर्माते सातत्याने कलाकारांशी खोटं बोलत आहेत. सुरुवातीला आम्हाला फक्त आठवड्यातून दोन दिवस काम करावं लागेल असं सांगण्यात आलं होतं. पण आता आमच्याकडून १२-१२ तास काम करुन घेतलं जात आहे. या शोचं केंद्रस्थान सुनील ग्रोवर आहे. आम्ही फक्त मागे उभं राहून टाळ्या वाजवण्याचं काम करत आहोत. इतक्या दिवसांत मला स्क्रिप्ट देखील मिळाली नाही. अशा शोमध्ये मी दिर्घ काळ काम करु शकत नाही. निर्मात्यांनी मला फसवलं आहे. या शोमध्ये कलाकारांचं मानसिक शोषण केलं जात आहे.” असे आरोप तिने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 3:30 pm

Web Title: siddharth sagar shilpa shinde gangs of filmistan mppg 94
Next Stories
1 ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत होणार डॉ. अमोल कोल्हेंची एण्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
2 विद्या बालनं ट्रोलर्सवर भडकली; रियावर टीका करणाऱ्यांना केला सवाल
3 “हे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना”; सिद्धार्थनं केलं मदतीचं आवाहन
Just Now!
X