News Flash

सिद्धार्थ मल्होत्राला या गोष्टीची वाटतेय सर्वाधिक भीती…

ट्विटरवरुन सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या चाहत्यांना विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

sidharth malhotra fears: सिद्धार्थच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनी वाट पाहत आहेत

प्रत्येकाच्या मनात काही ना काही भीती असते. बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला सर्वात मोठी भीती आहे की तो ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती दुरावणे. सध्या सिद्धार्थ मल्होत्रा एका शुटिंगनिमित्त बॅंकॉक येथे आहे. तेथून त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तुला सर्वात जास्त भीती कशाची वाटते असे त्याला विचारले असता त्याने उत्तर दिले ज्या व्यक्तीवर माझे प्रेम आहे ती व्यक्ती दुरावण्याची मला सर्वाधिक भीती वाटते.

चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही तर तुला भीती वाटत नाही का असे त्याला विचारला असता त्याने त्याचे सकारात्मक उत्तर दिले. अपयशी होण्याची भीती मला सतावते परंतु अपयशी होऊ नये म्हणून मी खूप मेहनत घेतो. यशस्वी होण्यासाठी एखाद्या प्रेरणेची आवश्यकता असते. आणि हीच भीती मला जास्तीत जास्त प्रयत्न करुन यशस्वी होण्यास प्रेरित करते असे त्याने त्याच्या चाहत्यांना सांगितले.

कॉफी विथ करणच्या मागील सीजनमध्ये आलिया भट्ट आणि वरुण धवनसोबत त्याने हजेरी लावली होती. त्यांच्या या मुलाखतीची खूप चर्चा झाली होती. त्यामुळेच चाहत्यांनी त्याला विचारले की कॉफी विथ करणमध्ये तुम्ही केव्हा परतणार आहात? आपण भारतात आल्यानंतर कॉफी विथ करणमध्ये सहभाग नोंदवू असे तो म्हणाला.

मुकेश भट यांचा आशिकी ३ लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. प्रेक्षकांना खरी उत्सुकता आहे ती आशिकी ३ मध्ये कलाकार कोण असणार याची. मोहित सुरीने नुकताच सांगितले की आशिकी ३ मध्ये आलिया भट्ट असणार आहे. तिच्या जोडीला सिद्धार्थ मल्होत्रा असणार अशी चर्चा जोर धरत आहे. अद्याप आशिकी ३ मध्ये कलाकार कोण असेल याबाबत निर्माते मुकेश भट्ट यांनी कोणताही खुलासा केलेला नाही.

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राला घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते. सध्या मोहित सुरी चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित हाफ-गर्लफ्रेंडच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी दिसणार आहे.

आशिकी ३ ची पटकथा आलिया भट्ट ची बहिण शाहिण भट्ट हिने लिहिली आहे. सिद्धार्थ कपूरच्या पात्राला एक नवा ट्विस्ट देण्याचा विचार मोहित सुरी करीत आहे. आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी चित्रपटात पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 6:45 pm

Web Title: sidharth malhotra alia bhatt karan johar mahesh bhatt mukesh bhatt
Next Stories
1 ‘पद्मावती’ चित्रपटात दीपिकाला टक्कर देण्यास ऐश्वर्या सज्ज
2 ‘या’ अभिनेत्याच्या पत्नीने पोटगीसाठी मागितली ३० कोटी डॉलरची गडगंज रक्कम?
3 मीराने केला शाहीदसोबतच्या पहिल्या भेटीचा खुलासा
Just Now!
X