बॉलिवूडमधील तरुण कलाकारांमध्ये कोणतं कपल आवडतं असा जर कोणाला प्रश्न विचारला तर त्यांच्या यादीत सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांचं नाव नक्कीच असेल. या दोघांनी आपल्या नात्याबद्दल कधीही खुलासा केला नसला तरी त्यांच्या नात्याबद्दल सारेच जाणून होते. स्टुडंट ऑफ दी इयरची ही जोडी गेल्या कित्येक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होती. पण, आता मात्र हे दोघे एकत्र नाहीत. तुम्हाला कदाचीत ही बातमी खोटी वाटेल पण आता जवळजवळ हे निश्चितच झाले आहे.

रोहित शेट्टीसाठी रणवीर- कतरिना एकत्र येणार?

story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey
सफरनामा : दुचाकीवरून देशाटन
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
man killed in dispute between two groups over trivial reason in thane
ठाणे : क्षुल्लक कारणावरून दोन गटातील वादातून एकाची हत्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी संगनमताने ब्रेकअपचा निर्णय घेतलाय. आलिया आणि सिद्धार्थ सध्या एकमेकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच कोणत्याही आदोघांही एकमेकांना टाळताना दिसतायत. त्यांच्यातलं संभाषणही आता संपुष्टात आलंय. दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी जोरदार भांडण झाल्याचंही समजतंय. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला, हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

भविष्यात त्यांच्यात मैत्रीचं नातं टिकून राहील अथवा न राहिल पण सध्या तरी दोघांमध्ये कधीही न भरून निघेल असा दुरावा निर्माण झाला आहे. या दोघांमधील वादाचं मुख्य कारण तिसरी व्यक्ती असल्याचं म्हटलं जातंय. ही तिसरी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून जॅकलिन फर्नांडिस आहे. जॅकलिन आणि सिद्धार्थ ए जंटलमन या सिनेमात एकत्र काम करत आहेत. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्यात फार चांगली मैत्री निर्माण झाली असे म्हटले जात आहे. पण त्यांची ही मैत्री आता सिद्धार्थ- आलियाच्या नात्यामध्ये आलीये असेच म्हणावे लागेल.