News Flash

‘रीलोडेड बॉय’ बर्थडे सेलिब्रेशनसाठी तयार

भेटवस्तू आणि प्रेम यामध्ये कधीच तुलना करता येऊ शकत नाही.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा

‘बार-बार देखो’ आणि ‘कपूर अॅण्ड सन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करणारा सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या आगामी ‘रीलोड’ या चित्रपटाच्या चित्रिकरणातून मोकळा झाल्यानंतर वाढदिवसासाठी सज्ज झाला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आज त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन मित्रांसोबत करणार आहे. सिद्धार्थने बर्थडे सेलिब्रेशनची पूर्ण तयारी केली आहे. कामाचा व्याप बाजूला ठेवून सिद्धार्थ वाढदिवसाचा आनंद साजरा करणार आहे. वाढदिवसाच्या आनंदी क्षणी कोणतेही चित्रीकरण करणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. त्याच्या आगामी ‘रीलोडेड’ चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असल्यामुळे वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याला पूर्ण वेळ मिळाला आहे. त्याच्या पार्टीमध्ये मित्रांव्यतिरिक्त त्याचा भाऊ देखील सहभागी होणार आहे.

सिद्धार्थने एका मुलाखतीमध्ये म्हटले की, मी खूपच सामान्य जीवन शैली जगणे पसंत करतो. एखाद्या आनंदाच्या क्षणी विशेष तयारी करण्याला मी कधीही प्राधान्य देत नाही. यावेळी त्याने खवय्या असल्याचे कबुल केले. त्यामुळेच माझ्या वाढदिवसामध्ये खाद्यपदार्थांना अधिक मह्त्त्व असेल असे तो म्हणाला. बालपणीच्या आठवणी सांगताना तो म्हणाला की, मी सुरुवातीपासूम चॉकलेट केक कापत आलो आहे. त्यामुळे यंदाच्या बर्थडेला देखील चॉकलेट केकच असेल. वाढदिवसामध्ये भेट वस्तू एक सामान्य गोष्ट आहे. यावर देखील सिद्धार्थने आपली प्रतिक्रिया दिली. भेटवस्तू स्वीकारणे मला अस्वस्थ करते. मात्र इतरांप्रमाणे मलाही भेटवस्तू मिळाल्यास त्या आवडतात, असेही तो म्हणाला. भेटवस्तू आणि प्रेम यामध्ये कधीच तुलना करता येऊ शकत नाही, असे सांगत सिद्धार्थने मुंबईहून गोव्याला केक घेऊन आलेल्या त्याच्या मित्राचा केक आपल्यासाठी खास असल्याचे सांगितले.

यंदाचे नवे वर्ष सिद्धार्थसाठी खास असेच आहे. ‘टीसी कॅलेन्डर’ने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वाधिक ‘हॉट’ पुरुषांच्या यादीत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या नावाचीही दखल घेण्यात आली होती. सर्वाधिक ‘हॉट’ पुरुषांच्या यादीत सिद्धार्थला ९ वे स्थान मिळाले.. ‘अॅन्युअल इंडिपेंडन्ट क्रिटीक लिस्ट २०१६’च्या यादीत फक्त तीन भारतीय अभिनेत्यांच्या नावाचा समावेश आहे. ते तीन अभिनेते म्हणजे देव पटेल, शाहिद कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा. शाहिद कपूरला या यादीत ५३ वे स्थान मिळाले आहे. तर, देव पटेलला ९८ वे स्थान मिळाले आहे. पण, इथे सर्वाधिक लक्षवेधी ठरला तो म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा. सिद्धार्थच्या आजवरच्या चित्रपट कारकिर्दीत त्याने विविध अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर केली आहे. पण, त्याच्या आणि आलिया भट्टच्या ऑनस्क्रिन जोडीला प्रेक्षकांनी सर्वात जास्त पसंती दिली होती. किंबहुना आलिया आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. या दोघांच्याही मैत्रीचे गुपित काय हे मात्र ते स्वत:च जाणतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 3:31 pm

Web Title: sidharth malhotra birthday with friends and brothers
Next Stories
1 दीपिकासह विन डिझेलने घेतला मुंबईच्या ‘कटिंग चाय’चा स्वाद
2 २२ वर्षांनंतर सुरु होतेय चंद्रकांता मालिका; या अभिनेत्रीचा दिसणार बोल्ड लूक
3 VIDEO: तरुणीची छेड काढणाऱ्या इसमाला आतिफ अस्लमने खडसावले
Just Now!
X