News Flash

सिद्धार्थ झाला आलियाच्या कुटुंबाचा भाग?

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा

सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट हे दोघंही आपल्या नातेसंबंधांबद्दल सार्वजनिक ठिकाणी बोलणे टाळतातच. पण, कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात ते एकत्र दिसतात आणि त्यांच्यातल्या याच बातम्यांना अजून मजबूतदेखील करतात. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगत होत्या. पण नुकताच तो आलिया भट्टची बहिण शाहीन हिच्या बर्थडे पार्टीमध्ये दिसला. भट्ट कुटुंबियांसोबत एका हॉटेलमध्ये पार्टी करताना तो दिसला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिथे उपस्थित असलेल्या त्यांच्या चाहत्यांपैकीच एकाने हा व्हिडिओ काढला. यात सिद्धार्थ भट्ट कुटुंबियांसोबत किती एन्जॉय करत आहे हे स्पष्ट दिसते.

या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ आलियाच्या आईच्या सोनी राझदानच्या बाजूला उभा आहे. तर शाहीन केक कापताना दिसत आहे. याशिवाय इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिद्धार्थ आणि आलियाचा एक फोटो शेअर झाला आहे. त्यात त्यांच्या फोटोला त्यांच्या चाहत्यांनी छानसा मेसेजही लिहिला आहे.

सध्या आलिया ‘डिअर जिंदगी’च्या यशामुळे चांगलीच खूश आहे. सिद्धार्थनेही तिच्या कामाचे कौतुक करण्याची संधी सोडली नाही. त्याने ट्विटरच्या माध्यमातून डिअर जिंदगी सिनेमाचे आणि आलियाचे भरभरुन कौतुक केले. त्याच्या या ट्विटला आलियानेही फार मोहक उत्तर दिले. ‘धन्यवाद सिड, लव्ह यू’ असे तिने या ट्विटमध्ये म्हटले.

Next Stories
1 कटप्पाने बाहुबलीला का मारले ? हे राज्यवर्धन राठोड यांना माहित!
2 VIDEO: करिनासोबतच्या पहिल्याच भेटीत रणवीरने दाखवला नखरा
3 VIDEO: ‘डॅडी’चा फर्स्ट लूक प्रदर्शित
Just Now!
X