02 March 2021

News Flash

पाहाः सिद्धार्थ मल्होत्रा का घाबरतो सोनाक्षीला

त्याने सोनाक्षीच्या पहिल्या सिनेमाचा डायलॉग रेकॉर्ड केला

सोनाक्षी सिन्हाचा ‘अकिरा’ हा सिनेमा येत्या २ सप्टेंबरला प्रदर्शित होतोय. ती स्वतः सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिच्या या प्रमोशनमध्ये आता अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही तिच्या मदतीला धावून आला आहे.
पण त्याला स्वतःलाच सोनाक्षीची भिती वाटते. झालं असं की सिद्धार्थने सोनाक्षीच्या ‘अकिरा’ला प्रमोट करण्यासाठी त्याने एक व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. त्यात त्याने सोनाक्षीच्या पहिल्या सिनेमाचा डायलॉग रेकॉर्ड केला. त्यात तो बोलतो की, ‘थप्पड से डर नही लगता साहब अकिरा से लगता है…’ या डायलॉगनंतर तो ‘अकिरा’ सिनेमा बघण्याचे आवाहन त्याच्या फॅन्सना करतो.
गमतीशीर गोष्ट म्हणजे, ‘दबंग’ सिनेमात चुलबुल पांडे ओरडल्यावर सोनाक्षी हा डायलॉग बोलते. पण, ‘अकिरा’मध्ये तर सोनाक्षीच सिनेमात दबंगगिरी करताना दिसत आहे. सिद्धार्थच्याआधी अक्षय कुमारनेही ‘अकिरा’ सिनेमाला प्रमोट करण्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता.
या सिनेमाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास यांनी केले आहे. ‘अकिरा’मध्ये राजस्थानमधून मुंबईत आलेल्या मुलीची कथा सांगण्यात आली आहे. ‘अकिरा’मध्ये सोनाने अकिरा नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘अकिरा’ जोधपूरवरून मुंबईला शिकायला येते आणि अचानक कॉलेजमधील एका आत्महत्या प्रकरणात तिला गोवण्याचे प्रयत्न होतो. पण अकिरा भ्रष्ट व्यवस्था आणि भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध उभी राहते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 6:33 pm

Web Title: sidharth malhotra promotes sonakshi sinhas film akira
Next Stories
1 त्या मुलीला लागला ‘बेबी डॉल’चा लळा
2 ‘बिग बॉस १०’ चा धमाकेदार प्रोमो प्रदर्शित
3 साठी ओलांडलेल्या या हरहुन्नरी अभिनेत्याला ओळखलंत का?
Just Now!
X