News Flash

‘कलंक’चा टीझर पाहून अलियाचा एक्स बॉयफ्रेंड म्हणतो…

अलियाचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे 'कलंक'वर ट्विट

‘कलंक’चा टीझर पाहून अलियाचा एक्स बॉयफ्रेंड म्हणतो…
सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर यांच्या ‘कलंक’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. तगडं स्टारकास्ट असलेल्या चित्रपटाच्या टीझरला सोशल मीडियावर तुफान प्रतिसादही मिळाला आहे. दोन मिनिटांच्या या टीझरमध्ये भव्यदिव्य सेट आणि डोळे दिपवणारी दृश्य दिखवून निर्माता करण जोहरने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती चित्रपटाचा ट्रेलरची.

‘कलंक’ चित्रपटाच्या टीझरने फक्त चाहत्यांवरच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्यांवरही जादू केली आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रीया ट्विटरव्दारे व्यक्त केल्या आहेत. त्यामधील सर्वांचं लक्ष वेधणारी प्रतिक्रिया ही अलियाचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची आहे. ‘वाह… मस्तच! सुंदर दिसताय’ असं त्यानं ट्विट केलं. त्यावर अभिनेत्री आलिया भट्टने ‘धन्यवाद’ असं रिट्विट करत उत्तर दिलं.

या आधी सिद्धार्थला ‘कॉफी विथ करण पर्व ६’च्या चॅट शोमध्ये आलिया आणि त्याच्या ब्रेकअप बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ‘खरं सांगायच तर आम्ही ब्रेकअपनंतर भेटलोही नाही. मी तिला डेट करण्याआधीपासून ओळखतो. तेव्हा आम्ही मित्र-मैत्रीण होतो आणि भविष्यातही राहू’ असं सिद्धार्थ म्हणाला होता.

धर्मा प्रॉडक्शन्स निर्मित ‘कलंक’ चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2019 6:23 pm

Web Title: sidharth malhotra tweet on ex girlfriend alia bhatt kalank teaser
Next Stories
1 Video : प्रेमातील गोडवा जपणारं ‘शिमगा’मधील गाणं प्रदर्शित
2 बॉलिवूडमध्ये टिकून राहण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करणार का?; सारा म्हणते..
3 ‘अपना टाइम आ गया है’, मतदारांना जागं करण्यासाठी मोदींचं कलाकारांना आवाहन
Just Now!
X