बिग बॉस १३ मध्ये सर्वाधिक गाजलेली जोडी म्हणजे सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गील. बिग बॉस १३चं पर्व संपल्यानंतरही ही जोडी सातत्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं दिसून येतं. अलिकडेच या दोघांचं शोना शोना हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चिलं जात आहे.

टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांच्या आवाज शोना शोना हे गाणं स्वरबद्ध झालं असून या गाण्याची निर्मिती अंशुल गर्ग यांनी केली आहे. फक्त सिद्धर्थ आणि शहनाजची जोडी नव्हेतर या गाण्यानेही प्रेक्षकांच मन जिंकल आहे.

दरम्यान, या सिद्धार्थ -शहनाजचं यापूर्वी भुला दुँगा हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. विशेष म्हणजे या गाण्याने लोकप्रियतेत शकिराच्या वाका वाका या गाण्याचा रेकॉर्ड मोडल्याचं सांगण्यात येतं.