करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला. या लॉकडाउनमुळे अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी पंतप्रधान मोदींची लॉकडाउनसाठी स्तुती केली आहे. मोदींनी योग्य रितेने करोना विषाणूला हाताळले असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अवश्य पाहा – मसक्कलीच्या रिमेकवर ए. आर. रेहमान यांचा उपरोधिक टोला; म्हणाले…

काय म्हणाल्या सिमी गरेवाल?

“भारताने ज्या प्रकारे करोना विषाणूचा मुकाबला केला त्याचा मला अभिमान आहे. परंतु याचं पहिले श्रेय जातं ते नरेंद्र मोदी यांनाच. त्यांनी योग्य निर्णय घेत वेळीच लॉकडाउन केले त्यामुळे करोनाचा फैलाव नियंत्रणात आला. या प्राणघातक विषाणूचे संक्रमण पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात कमी गतीने होत आहे.” अशा आशयाचे ट्विट करुन सिमी गरेवाल यांनी मोदींची स्तुती केली आहे.

अवश्य पाहा – आता घरबसल्या तयार करा मास्क; अभिनेत्याने सांगितली सोपी पद्धत

लॉकडाउन केल्यानंतरही करोना विषाणूचे संक्रमण अद्याप थांबलेले नाही. देशातील करोनाग्रस्तांची संख्या चार हजारांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर सिमी गरेवाल यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे.