01 March 2021

News Flash

‘सिम्बा’ची परदेशातही गाडी सुसाट , १०० कोटींपासून काही पावलं दूर

या चित्रपटानं भारतात २३६.८० कोटींची कमाई केली आहे तर जगभरातही हा चित्रपट बक्कळ कमाई करत आहे.

रणवीर सिंग

रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेला ‘सिम्बा’ गेल्यावर्षी डिसेंबर अखेरीस प्रदर्शित झाला. या चित्रपटानं भारतात २०० कोटींहून अधिकची कमाई केली. तर जगभरातही हा चित्रपट बक्कळ कमाई करत आहे. विशेष म्हणजे ४ आठवड्यात ‘सिम्बा’चं इंटरनॅशनल कलेक्शन हे ९२ कोटींवर पोहोचलं आहे.

अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इथलं बॉक्स ऑफिस कलेक्शन हे ९२ कोटी ८० लाख आहे. २० जानेवारीपर्यंतचं हे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे. परदेशातील जवळपास ९६३ स्क्रिनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. आतापर्यंत या चित्रपटानं भारतात २३६.८० कोटींची कमाई केली आहे. रणवीरसोबतच सारा अली खान आणि ११ मराठी कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. रोहित शेट्टीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये ‘सिम्बा’ला खूप मोठी ओपनिंग पहिल्याच आठवड्यात मिळाली होती. यापूर्वी रोहित शेट्टीचे ‘गोलमाल’, ‘गोलमाल अगेन’, ‘गोलमाल ३’, ‘सिंघम’, ‘सिंघम रिर्टन’ चित्रपट परदेशात प्रदर्शित झाले होते त्यांना चांगला प्रतिसाद लाभला होता. मात्र सिम्बाला या सर्व चित्रपटांहून अधिक प्रतिसाद मिळला. ‘सिम्बा’ २८ डिसेंबरला जगभरात ‘सिम्बा’ प्रदर्शित झाला. २०१८ मधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट ठरला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 3:23 pm

Web Title: simmba international collection after 4 weekend
Next Stories
1 गर्दीत एकाने मला नको त्या ठिकाणी चिमटा काढला-कंगना राणावत
2 शाहरुखच्या मुलाचं फेसबुक अकाऊंट हॅक
3 ‘अश्रूंची झाली फुले’ सुबोध आणणार पुन्हा एकदा रंगमंचावर
Just Now!
X