ज्याप्रमाणे जेवण रुचकर लागण्यासाठी त्यामध्ये मसाल्यांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे चित्रपट मनोरंजक होण्यासाठी त्यात अॅक्शन, ड्रामा, रोमान्स, कॉमेडी या सर्वांची थोडीफार गरज असते. असाच एक मसालापट दिग्दर्शक रोहित शेट्टी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘सिम्बा’ हा बहुचर्चित चित्रपट आज (शुक्रवारी) प्रदर्शित झाला. पण त्यापूर्वी गुरुवारी दुबईत हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर त्याचीच चर्चा होऊ लागली. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेल्या प्रेक्षकांनी ट्विट करत चित्रपटाचा थोडक्यात रिव्ह्यूच दिला आहे.

या चित्रपटात रणवीर एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. त्याची एण्ट्री, त्याचं अभिनय, संवाद जबरदस्त असल्याचं एका प्रेक्षकाने ट्विट केलं आहे. तर रोहित शेट्टीचा हा चित्रपट ‘पैसा वसूल’ असल्याचंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. काहींनी हा चित्रपट ‘मेगा ब्लॉकबस्टर’ ठरेल असाही अंदाज वर्तवला आहे.

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
Manjummel Boys movie to release OTT
अवघ्या २० कोटींचं बजेट अन् कमावले २२५ कोटी, एकही अभिनेत्री नसलेला ‘हा’ सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित
Samantha Ruth Prabhu in atlees upcoming film with south star allu arjun
ब्रेकनंतर समांथा रुथ प्रभू अ‍ॅटलीच्या चित्रपटातून करणार पुनरागमन; ‘हा’ सुपरस्टार असणार मुख्य भूमिकेत

विशेष म्हणजे रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात तब्बल अकरा मराठी कलाकारांची फौज आहे. तर अभिनेता अजय देवगण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.