07 June 2020

News Flash

सिंगापूर दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचा सन्मान!

या चित्रपटामध्ये एका आईने पोलीस यंत्रणेविरुद्ध दिलेल्या लढ्याची कथा दाखविण्यात आली आहे

एका आईने पोलीस यंत्रणेविरुद्ध दिलेल्या लढ्याची हेलावणारी कथा असलेल्या ‘माई घाट : क्राइम नं. 103/2005’ या मराठी चित्रपटाने ‘सिंगापूर दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात’ बेस्ट चित्रपटाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळविणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही मराठी चित्रपटाला हा सन्मान मिळालेला नाही.

आठ देशांमधून चौदा चित्रपटांची निवड करण्यात आली होती. या चौदा चित्रपटांपैकी ६ बेस्ट चित्रपट निवडले. या ६ चित्रपटांमधून ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’, ‘संकलन’ व ‘छायाचित्रण’ असे पहिल्या श्रेणीतील तीन महत्वाचे पुरस्कार ‘माई घाट : क्राइम नं. 103/2005’ या चित्रपटाने पटकावून बाजी मारलेली आहे.
महिला सशक्तीकरणाची कथा सांगणारा हा चित्रपट युवा निर्माती मोहिनी रामचंद्र गुप्ता त्यांच्या ‘अलकेमी व्हिजन वर्क्स’ची निर्मिती असून अत्यंत वेगळ्या जातकुळीच्या अंतर्मुख करणाऱ्या सत्यघटनेवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. या चित्रपटात एका महिलेनी दिलेला विलक्षण लढा, त्यावर तिने मिळविलेला रोमहर्ष विजयाची गाथा काळजाला हात घालणारी असल्यानं हे निर्मितीचं शिवधनुष्य मोहिनी गुप्ता या तरुणीने उचललं आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन अनंत नारायण महादेवन यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या कथालेखन आणि संकलनही त्यांनीच केलं आहे.

दरम्यान,अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘सिंगापूर साऊथ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘माई घाट’नं सात विभागांमध्ये तब्बल सहा नामांकनं मिळवत ‘बेस्ट फिल्म’, ‘बेस्ट एडिटींग’, ‘बेस्ट सिनेमॅटोग्राफी’चे पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. हाँगकाँग अँण्ड चायनाचे फिल्ममेकर आणि फेस्टिव्हल अॅथॅारिटी असलेल्या रॅाजर गार्सीया यांनीही ‘माई घाट’च्या पाठीवर कौतुकाची थाप मारत न्याय व्यवस्थेतील ढिलाई दर्शवणाऱ्या या वास्तवदर्शी सिनेमावर स्तुती सुमनांची उधळण केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 4:58 pm

Web Title: singapore south asian film festival mai ghat no crime 1032005 ssj 93
Next Stories
1 Video : राजकुमार राव-मौनीच्या ‘मेड इन चायना’चा ट्रेलर प्रदर्शित
2 …म्हणून आई होण्याची मल्लिकाला वाटतेय भीती
3 व्हिएफएक्सच्या बळावर होणार पहिल्यांदाच १०० मराठी लघुपटांची निर्मिती
Just Now!
X