News Flash

‘मी दृष्ट काढते…’; दिवाळीनिमित्त आशा भोसले यांची खास पोस्ट

आशा भोसले यांनी शेअर केला खास व्हिडीओ

दिवाळी असल्यामुळे सध्या सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक जण प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे. यामध्येच सेलिब्रिटीदेखील ट्विटर, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. यामध्येच लोकप्रिय गायिका आशा भोसले यांनीदेखील व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

आशा भोसले यांनी शुभेच्छांचा व्हिडीओ शेअर करण्यासोबतच सगळ्यांची दृष्टदेखील काढली आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांना औक्षण करते व दृष्ट काढते त्याचप्रमाणे मी सगळ्यांची दृष्ट काढते असं त्यांनी म्हटलं आहे

दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. दिवाळीनंतर सुरु होणाऱ्या नव्या वर्षात तुमच्या सगळ्यांच्या चिंता, विवंचना दूर होतील. तुम्ही सगळे सुखी व्हाल अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आई जशी आपल्या मुलांना औक्षण करते, त्यांची दृष्ट काढते त्याचप्रमाणे मी तुमच्या सगळ्यांची दृष्ट काढते, असं आशा भोसले या व्हिडीओमध्ये म्हणाल्या आहेत.


‘या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा, दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या नव-वर्षात तुम्हा सर्वांच्या चिंता, दु:ख दूर होतील. आणि तुम्ही सगळे सुखी व्हाल अशी मी देवाकडे प्रार्थना करते. एखादी आई जशी आपल्या मुलाचं औक्षण करते, त्याची दृष्ट काढते तशीच मी तुम्हा सर्वांची दृष्ट काढत आहे. शुभ दिपावली.’

आशा भोसले यांनी शेअर केलेला व्हिडीओ अतिशय हृदयस्पर्शी आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपल्या आईच्या प्रेमाची आठवण आली असेल. आशाताईंनी दिवाळीच्या इतक्या सुंदर पद्धतीने शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला अवघ्या एका तासात 16 हजार व्ह्यूज आले आहेत. 4 हजार युझर्सनी लाइक केला आहे. आशा भोसले यांचं भारतीयांच्या मनात अढळ स्थान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 12:17 pm

Web Title: singer asha bhosle shared diwali greetings video shared ssj 93
Next Stories
1 भव्य रांगोळीतून साकारले ‘सरसेनापती हंबीरराव’चे पोस्टर
2 सुपरहिट चित्रपट देऊनही ‘या’ अभिनेत्रीच्या करिअरला लागला ‘ब्रेक’; कारण…
3 विराटच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे अनुष्का झाली ट्रोल
Just Now!
X