जगात महिलांवर होणाऱ्या बलात्कार, अपहरण, लैंगिक अत्याचारासारख्या घटना सतत घडटतच असतात. पण या घटना केवळ सामान्य मुली किंवा महिलांसोबतच नाही तर अनेक सेलिब्रिटींसोबतही होत असल्याचे समोर येत असते. नुकताच एका पॉपस्टार गायिकेने तब्बल १० वर्षांनंतर तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेल्सची पॉपस्टार गायिका डफीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. ‘माझा वाढदिवस होता. मला एका हॉटेलमध्ये ड्रग्स देण्यात आले. त्यानंतर सलग चार दिवस मला ड्रग्स देण्यात आले आणि मला दुसऱ्या देशात नेण्यात आले. मी विमानात कधी चढले? कधी उतरले मला काहीच आठवत नाही. त्यानंतर मला पुन्हा एका हॉटेलच्या रुममध्ये ठेवण्यात आले. यावेळी माझ्यावर बलात्कार देखील करण्यात आला’ असे तिने म्हटले.

‘त्यानंतर मी शुद्धीत राहण्याचा प्रयत्न करत होते. एक दिवस एका व्यक्तीने मला त्याच्या मागे चालण्यास सांगितले. तेव्ही मी अचानक शुद्धीत आले आणि तेथून पळून आले. त्यावेळी हे सर्व सहन करण्याची हिंमत माझ्यात कुठून आली हे मला माहित नाही पण त्या अपराधीने मला मारण्याचा प्रयत्न केल्याचे कबुल केले’ असा खुलासा पुढे तिने केला.

या घटनेनंतर डफीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या असल्याचे म्हटले जाते. तसेच तिने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता. पण डफीच्या थेरपिस्टने तिला यातून बाहेर पडण्यास मदत केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer duffy and her horrifing rape story avb
First published on: 07-04-2020 at 19:53 IST