करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. देशभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. लॉकडाउनमुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. कोट्यवधींचं नुकसान होत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत सर्वत्र निराशेचं वातावरण निर्माण झालं आहे. परंतु या निराशामय वातावरणात सकारात्मक राहण्यासाठी गायक हरिहरन यांनी काही सोप्या टीप्स आपल्या चाहत्यांना दिल्या आहेत.

अवश्य पाहा – बिग बॉस १४ मध्ये झळकणार ग्लॅमरस पवित्रा; ७ दिवसांसाठी मिळणार लाखो रुपयांचं मानधन

आज तकला दिलेल्या मुलाखतीत हरिहरन यांनी नैराश्यापासून वाचण्यासाठी काही सोप्या टीप्स सांगितल्या. ते म्हणाले, “तुम्ही घरात थांबून करोनापासून वाचू शकता पण या नकारात्मक वातावरणामुळे तुम्ही हळुहळु डिप्रेशनमध्ये जात आहात. नैराश्यापासून वाचण्यासाठी दररोज योग करा. मेडिटेशन करा. जर येत नसेल तर इंटरनेटवर व्हिडीओ पाहून ते शिका. कारण या कठीण परिस्थितीत मेंदू शांत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. विविध प्रकारचे ऑनलाईन कोर्स करा. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रात आणखी यशस्वी होण्यासाठी ज्या स्किल्सची गरज आहे. त्या गोष्टींना आत्मसाद करा. कुटुंबीयांसोबत गप्पा मारा. कॅरम, लुडो, सापसीडी असे खेळ आपल्या कुटुंबीयांसोत खेळा. जेणेकरुन तुमचा ताण कमी होईल. आणि घरातील वातावरण सकारात्मक राहील.”

अवश्य पाहा – “प्यार एक धोका हैं…” अभिनेत्रीला प्रियकराने फसवलं: दुसऱ्याच तरुणीबरोबर केलं लग्न

५३ लाखांपेक्षा अधिक रूग्णांची करोनावर मात

गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८१ हजार ४८४ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसंच १ हजा ०९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. यानंतर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६३ लाख ९४ हजार ४८४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे देशात सध्या ९ लाख ४२ हजार २१७ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५३ लाख ५२ हजार ०७८ जणांनी करोनावर मात केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसंच आतापर्यंत ९९ हजार ७७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचंही सांगण्यात आलं.