05 June 2020

News Flash

Coronavirus : कनिका कपूर करोनामुक्त; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

सहावा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर गायिका कनिका कपूरला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

कनिका कपूर

सहावा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर गायिका कनिका कपूरला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी तिचा हा रिपोर्ट आला. याआधी पाच वेळा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGIMS) याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू होते.

१६ मार्च रोजी कनिकामध्ये करोना व्हायरसची लक्षणे दिसून येऊ लागली होती आणि २० मार्च रोजी तिचा पहिला करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

आणखी वाचा : ‘चेन्नई एक्स्प्रेस’ निर्मात्याच्या मुलीला करोनाची लागण

कनिकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय होती. करोनाची लागण झाल्यानंतरही ती डिनर पार्टीला गेली होती. तिच्या संपर्कात आलेल्या जवळपास २५० ते ३०० लोकांचा नंतर शोध घेण्यात आला होता. सुदैवाने त्यापैकी कोणाला अद्याप करोनाची लागण झालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 10:40 am

Web Title: singer kanika kapoor discharged from hospital after sixth test report comes negative ssv 92
Next Stories
1 ‘जगा आणि जगू द्या’; इंटिमेट फोटोमुळे ट्रोल करणाऱ्यांना सुष्मिता सेनच्या वहिनीचं उत्तर
2 ‘चेन्नई एक्स्प्रेस’ निर्मात्याच्या मुलीला करोनाची लागण
3 ‘देख भाई देख’च्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याच्या मुलाचा झाला होता मृत्यू, जाणून घ्या सविस्तर…
Just Now!
X