News Flash

Coronavirus : अखेर कनिका कपूरचा सहावा करोना रिपोर्ट निगेटिव्ह

मात्र रुग्णालयातून अद्याप डिस्चार्ज नाही.

कनिका कपूर

गायिका कनिका कपूरचा सहावा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. शनिवारी तिचा हा रिपोर्ट आला. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त दिलं. दर ४८ तासांनी करोनाबाधित रुग्णाची चाचणी करण्यात येते. याआधी पाच वेळा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र कनिकाला अजूनही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला नाही.

कनिकाची अजून एकदा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास तिला डिस्चार्ज देण्यात येईल. सध्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGIMS) याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू आहेत. १६ मार्च रोजी कनिकामध्ये करोना व्हायरसची लक्षणे दिसून येऊ लागली होती आणि २० मार्च रोजी तिचा पहिला करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

कनिकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय होती. करोनाची लागण झाल्यानंतरही ती डिनर पार्टीला गेली होती. तिच्या संपर्कात आलेल्या जवळपास २५० ते ३०० लोकांचा नंतर शोध घेण्यात आला होता. सुदैवाने त्यापैकी कोणाला अद्याप करोनाची लागण झालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 9:28 am

Web Title: singer kanika kapoor tests negative for coronavirus in sixth report ssv 92
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दिव्या भारतीमुळे ‘या’ अभिनेत्रीला मिळाला स्टारडम
2 उद्धव ठाकरे कौतुकास पात्र, माझा त्यांना सलाम – जावेद अख्तर
3 ‘त्या’ ट्विटमुळे उर्वशी आली अडचणीत; होतोय चोरीचा आरोप
Just Now!
X