News Flash

कार्तिकीचं यंदा कर्तव्य आहे! साखरपुडा ठरला

लग्नाची तारीख अद्याप काढलेली नाही

‘सा रे ग म प- लिटील चॅम्प्स’ या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी कार्तिकी गायकवाड सध्या चर्चेत आहे. या चर्चेचं कारण ठरलंय ते म्हणजे कार्तिकीचा साखरपुडा. आपल्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारी कार्तिकीचे आयुष्य आता एका नव्या वळणावर आहे. खुद्द कार्तिकीनेच ही माहिती दिली आहे.

‘झी २४ तास’ने दिलेल्या वृत्तानुसार कार्तिकीचा येत्या २६ जुलैला रोनित पिसेसोबत साखरपुडा होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा पाहण्याचा कार्यक्रम पार पडला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

 

View this post on Instagram

 

माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस तुझा आहे हे सांगण्याचा आजचा हा खास दिवस मातृदिनाच्या खुप शुभेच्छा आई जगातील प्रत्येक आईला उदंड आभाळाएवढ आयुष्य लाभो , तिच्या मुलांकडून तिला खुप प्रेम लाभो आणि जगातील प्रत्येक स्त्री चा आदर त्यांच्याकडुन होवो हि विश्वाची माऊली असलेल्या माऊलींचरणी प्रार्थना

A post shared by Kartiki Kalyanji Gaikwad (@kartiki_kalyanji_gaikwad9) on

कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांनी मित्रपरिवारात हे लग्न ठरवले आहे. रोनित पिसे हा पुण्याचा राहणारा असून तो इंजिनिअर आहे. लग्नाची तारीख अद्याप काढण्यात आलेली नाही अशी माहिती कार्तिकीने दिली आहे.

कार्तिकी ‘सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स’ विजेती ठरली होती. तिच्यासोबत आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत हे स्पर्धक होते. त्यानंतर तिने कलर्स वाहिनीवरील ‘राइझिंग स्टार’ या रिअॅलिटी शो मध्येही सहभाग घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 6:22 pm

Web Title: singer kartiki gaikwad going to engaged avb 95
Next Stories
1 सुपरहिरो ‘थॉर’ होणार हल्क होगन; WWE रिंगमध्ये करतोय सराव
2 कतरिनाच्या बहिणीला पाहिलेत का? फोटो होतोय व्हायरल
3 आलियाच्या आयुष्यात आली सेल्फी क्वीन मैत्रीण; फोटो होतोय व्हायरल…
Just Now!
X