‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे विजेतेपद पटकावणारी गायिका कार्तिकी गायकवाडने व्यावसायिक रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली. जुलै महिन्यात कार्तिकीचा साखरपुडा पार पडला. आता मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत तिचा व रोनितचा विवाहसोहळा पार पडला. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि गायिका आर्या आंबेकर यांनी सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही दिलं होतं निमंत्रण
कार्तिकी आणि तिचे वडील गायक-संगीतकार कल्याणजी गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लग्नाचं निमंत्रण दिलं होतं.
लॉकडाउनमध्ये झाला साखरपुडा
‘घागर घेऊन’, ‘नवरी नटली’ यांसारख्या खर्ड्या आवाजातील गाण्यांनी रसिकांना वेड लावणारी कार्तिकी अनेकांच्या लक्षात आहे. लॉकडाउनच्या काळात म्हणजेच जुलै महिन्याच्या सुरुवातीला कार्तिकीचा शुभविवाह ठरला आणि साखरपुडाही पार पडला. कार्तिकीने सोशल मीडियावर साखरपुड्याचे काही फोटो शेअर करत चाहत्यांना ही सुखद बातमी दिली होती.
पाहा फोटो >> मृण्मयी देशपांडे ते नेहा पेंडसे.. पाहा मराठी अभिनेत्रींचा मनमोहक ‘ब्राइडल लूक’
कार्तिकिचा पती रोनित पिसे हा पुण्याचा राहणारा असून इंजिनीअर आहे. विशेष म्हणजे रोनितलाही संगीताची आवड आहे. तो उत्तम तबलावादक आहे. गायकवाड कुटुंब आळंदीत राहत असून कार्तिकी आपले वडील आणि गुरू कल्याणजी गायकवाड यांच्या संगीताचा वारसा चालवते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 10, 2020 11:39 am