18 January 2021

News Flash

वडिलांसाठी गायक कुणाल शर्माने काढला कपिल शर्माच्या नावाचा टॅट्यू

जाणून घ्या कारण...

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो.’ या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा आणि त्याची संपूर्ण टीम प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. शोमध्ये हजेरी लावणाऱ्या पाहुण्या कलाकारांमुळे शो आणखी रंजन होत असल्याचे पाहायला मिळते. नुकताच शोमध्ये गायक कुणाल शर्माने कुटुंबीयांसोबत हजेरी लावली. दरम्यान कुणालने शोमध्ये कपिलच्या नावाचा टॅट्यू काढला असल्याचे सांगितले आहे.

कुणालने कपिल शर्मा शोमध्ये कपिल शर्मासोबत मजा मस्ती केली. दरम्यान त्याने एक किस्सा सांगितला. तो ऐकून कपिल देखील भावूक झाला होता. कुणालने त्याच्या वडिलांची प्रकृती एकदा खालावली असल्याचे सांगितले. पण त्यावेळी कपिल शर्मा शो सुरु झाला आणि त्याच्या घरातील वातावरण पूर्णपणे बदलले. कुणाल कुटुंबीयांसोबत कपिल शर्मा शोचे सगळे भाग पाहायचा. त्यानंतर हळूहळू त्याच्या वडिलांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. शो पाहून ते आनंदी व्हायचे. त्यावेळी मी विचारपण केला नव्हता की कधी कपिल शर्माला भेटेन असे कुणाल म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Oye Kunaal (@oyekunaal6)

 

View this post on Instagram

 

A post shared by Oye Kunaal (@oyekunaal6)

एक वेळ तर अशी होती की मी माझ्या वडिलांना घेऊन कपिल शर्माला भेटवण्यासाठी मुंबईला आलो होतो. पण त्यावेळी हा टॅट्यू माझ्या हातावर नव्हता. त्यानंतर मी कपिल शर्माला भेटलो. कपिल शर्मामुळे आज मी आनंदी आहे. त्यामुळे मी त्याच्या नावाचा टॅट्यू काढला आहे असे कुणाल पुढे म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 6:43 pm

Web Title: singer kunal sahrma got kapil sharma tattoo avb 95
Next Stories
1 अभिनेत्याला येतेय सुशांतची आठवण; विमानाचं तिकिट पाहून झाला भावूक
2 ‘कालीन भैय्या’ची फॅन आहे ही पाकिस्तानी अभिनेत्री, पोस्ट पाहताच पंकज त्रिपाठी म्हणाले..
3 VIDEO: बिग बॉसच्या घरात धक्काबुक्की; कविता-एजाजमधील भांडण पोहोचलं शिगेला
Just Now!
X