News Flash

लग्नात नेहाने केलं प्रियांका, अनुष्काला कॉपी? स्वतःच केला खुलासा, म्हणाली…

ट्रोल झाल्यावर नेहाने दिलं स्पष्टीकरण, म्हणाली...

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर सध्या चांगलीच चर्चेत आहे. २४ ऑक्टोबर रोजी नेहा आणि रोहनप्रीत सिंह यांनी लग्न केलं असून सध्या ही जोडी चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. आतापर्यंत या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेहाला अनेकांनी ट्रोलदेखील केलं आहे. नेहाने बॉलिवूड अभिनेत्रींना कॉपी करत लग्नातील कपडे डिझाइन केल्याचं अनेकांचं मत आहे. मात्र, आता नेहाने यावर मौन सोडलं असून तिने स्पष्टीकरण दिलं आहे.

नेहा आणि रोहनप्रीत यांचा विवाहसोहळा २०२० मधील सर्वात चर्चेत राहिलेला विवाहसोहळा असल्याचं म्हटलं जात आहे. या लग्नातील काही सोहळ्यांमध्ये नेहाने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा आणि दीपिका पदुकोण यांना कॉपी केल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, यावर नेहाने स्पष्टीकरण दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

We the #Sabyasachi Couple Loving our own song #NehuDaVya #NehuPreet #ReelItFeelIt

A post shared by Neha Kakkar (Mrs. Singh) (@nehakakkar) on

नेहाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिचे हे कपडे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची आणि Falguni Shane Peacock India यांनी डिझाइन केल्याचं तिने म्हटलं आहे. यात नेहाने गुरुद्वारात झालेल्या पारंपारिक लग्नसोहळ्यात परिधान केलेला लेहंगा सब्यासाची यांनी तिला गिफ्ट म्हणून दिला होता.

सब्यासाचीने डिझाइन केलेले कपडे परिधान करण्याची अनेकांची इच्छा असते. पण हा ड्रेस सब्यासाची यांनी स्वत: गिफ्ट केला आहे. जेव्हा तुम्ही मेहनत कराल तेव्हाच स्वप्न सत्यात उतरतं, असं नेहाने एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर इतका सुंदर लेहंगा गिफ्ट केल्यामुळ मनापासून धन्यवाद, असं आणखी एका पोस्टमध्ये तिने म्हटलं आहे.

दरम्यान, नेहाच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून तिच्या कपड्यांपासून ते दागदागिण्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीची चाहत्यांमध्ये विशेष चर्चा होत असल्याचं दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 2:53 pm

Web Title: singer neha kakkar wedding outfit troll sabyasachi design bridal lehenga ssj 93
Next Stories
1 “बालविवाह म्हणजे समाजाला लागलेली वैचारिक वाळवी”
2 चार वर्षात चौथं ब्रेकअप; डीएनएमुळे या अभिनेत्रीला बॉयफ्रेंडने सोडलं
3 अरेच्चा हे काय! लग्नात नेहाने केलं ‘या’ अभिनेत्रींना कॉपी?
Just Now!
X