गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच सेलिब्रिटींनीच्या लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या. त्यातच आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. ते नाव म्हणजे प्रसिद्ध मराठी गायिका सावनी रवींद्र हिचं. सध्या सावनी फारच आनंदात आहे. तिच्या आनंदाचं कारण, म्हणजे आयुष्यात सध्याच्या घडीला आलेलं एक सुखद वळण. हे वळण म्हणजे आयुष्याचा साथीदार गवसण्याचं. डॉ. आशिष धांडेसोबत सावनीचा साखरपुडा झाला असून तिनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली.

‘इंट्ररोड्यूसिंग डॉ. आशिष धांडे’, असं म्हणत तिने साखरपुडा झाल्याचा आनंद व्यक्त करणारी एक पोस्ट केली होती. त्यानंतर सावनीला चाहत्यांनी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. येत्या काही दिवसांमध्ये ते लग्न करणार असून, त्याविषयीची अधिकृत माहिती लवकरच समोर येईल असं म्हटलं जात आहे.

Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सावनी आणि डॉक्टर आशिष धांडेचा साखरपुडा पार पडला. यावेळी दोघांचेही मित्रमंडळी आणि कुटुंबियांची उपस्थिती पाहायला मिळाली. सावनीचा होणारा पती, आशिष हा मुळचा पुण्याचा असून त्याचे सगळे शिक्षण देखील पुण्यातच झाले आहे. दरम्यान, आशिष आणि सावनीच्या साखरपुड्याच्या फोटोंनी सध्या अनेकांचं लक्ष वेधलं आहे. ज्यामध्ये सावनीच्या खोडकर अदाही पाहायला मिळत आहेत.

वाचा : ‘व्हायरल’ची गंभीर साथ!

आपल्या सुरेख आवाजाने सावनीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आणि पाश्चिमात्य संगीताची उत्तम जाण असणाऱ्या सावनीने फक्त मराठीच नव्हे, तर तामिळ कलाविश्वातही आपल्या गायनाची जादू केली आहे.