14 August 2020

News Flash

आषाढी एकादशीनिमित्त सावनी रविंद्रचा पहिल्यांदा ऑनलाइन लाइव्ह कॉन्सर्ट

विठ्ठलाच्या भक्तीने ओथंबलेली गाणी, भक्तीगीते आणि अभंग

आषाढी एकादशीला देऊळांमध्ये आणि प्रेक्षागृहांमध्ये विठ्ठल-रखुमाईची भक्तिगीते, अभंग आणि गाणी ऐकण्याची संधी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमधल्या रसिकांना मिळते. परंतु यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर अशा कार्यक्रमांना रसिक मुकणार आहेत. मात्र गायिका सावनी रविंद्रने रसिकांसाठी यावर एक तोडगा काढला आहे. सावनी यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन लाइव्ह कॉन्सर्ट करत आहे. आषाढी एकादशी निमित्ताने ‘मन जाय पंढरीसी’ या ऑनलाइन लाइव्ह इन कॉन्सर्टद्वारे प्रेक्षक घरी बसल्या सहकुटुंब विठ्ठल भक्तीने ओथंबून जाणाऱ्या अजरामर भक्तीगीतांची अनुभूती घेऊ शकतात.

येत्या १ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. परंतु वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना बुधवारी दोन तासांचा कॉन्सर्ट अनुभवायला कदाचित शक्य होणार नाही. म्हणूनच शनिवारी २७ जून रोजी ही कॉन्सर्ट अगदी नाममात्र शुल्कासह ठेवण्यात आली आहे.

याविषयी सावनी रविंद्र म्हणते, “सध्या करोनाच्या प्रादुर्भावामूळे कुठलेच कार्यक्रम गेले दोन तीन महिने होऊ शकलेले नाहीत. असे असले तरीही, तंत्रज्ञानामुळे या लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियाद्वारे अनेक कलाकार आपल्या चाहत्यांशी जोडले गेले आहेत. आषाढी एकादशीचं निमित्त साधून ही पहिली वहिली ऑनलाइन लाइव्ह इन कॉन्सर्ट करायचे ठरवले आहे. सुप्रसिध्द गीतकार वैभव जोशी या कार्यक्रमाचे निरूपण करणार आहेत.”

सावनी पुढे सांगते, “यंदा महाराष्ट्रतले अनेक भक्त वारीतही सहभागी होऊ शकले नाहीत. पंढरपूरला दरवर्षी लोटणारा भक्तीचा महासागरही महाराष्ट्राला अनुभवता आला नाही. त्यामुळे पांडुरंगाच्या चरणी व्हर्च्युअली अशा पध्दतीने सेवा रूजू करण्याचा हा प्रयत्न आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 6:59 pm

Web Title: singer savni ravindra online concert on the occasion of ashadhi ekadashi ssv 92
Next Stories
1 “सुशांतने जे केलं ते मी…”;मनोज वाजपेयींची प्रतिक्रिया
2 सुशांतची ५५ लाखांची दुर्बिण आणि चंद्रावरची जमीन; वडिलांनी सांगितलं कनेक्शन
3 सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेतील विकी कौशलचा दमदार लूक प्रदर्शित
Just Now!
X