चीनच्या वुहान शहरातून फैलाव झालेल्या करोना विषाणूने जगातील जवळपास सगळ्याच देशांमध्ये हातपाय पसरले आहेत. त्यामुळे जगभरात सध्या भीतीचं वातावरण आहे. प्रत्येक देश त्याला शक्य होईल त्याप्रमाणे वैद्यकीय सुविधांची तरतूद करत आहे. तसंच काही सामाजिक संस्था, सेलिब्रिटींनी देखील गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतात अभिनेता प्रकाश राज, रजनीकांत, सोनम कपूर, जावेद अख्तर, मधूर भंडारकर, सलीम मर्चेंट यासारख्या सेलिब्रिटींनी गरजवंतांना मदत केली आहे. त्यातच आता कॅनडामध्येदेखील तेथील नागरिकांच्या मदतीसाठी लोकप्रिय गायक शॉन मेंडिस हा पुढे आला आहे. शॉनने उपचार घेणाऱ्या करोनाग्रस्त रुग्णांसाठी १७५ हजार डॉलरची आर्थिक मदत केली आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’नुसार, शॉन मेंडिस हा कॅनडामधील लोकप्रिय गायक असून त्याने कॅनडामधील एका रुग्णालयाला १७५ हजार डॉलर्स आर्थिक निधी म्हणून दिला आहे. या निधीमधून करोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. शॉनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

 

View this post on Instagram

 

shawnmendesfoundation.org

A post shared by Shawn Mendes (@shawnmendes) on

‘द शॉन फाऊंडेशन आणि मी करोना विषाणूचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल, यासाठीच्या प्रयत्न करत आहोत.  त्यामुळेच सध्या ज्या नागरिकांना करोनाची लागण झाली आहे, अशा रुग्णांच्या उपचारासाठी आम्ही सिककिड्स हॉस्पिटलला आर्थिक मदत केली आहे’, असं शॉनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, शॉन कॅनडामधील लोकप्रिय गायक असून तीन वेळा त्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.  शॉनप्रमाणेच ब्लॅक लायवली, रेयान रेनॉल्ड्स, बॅथनी फ्रँकल या कलाकारांनीही गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.