News Flash

अवघ्या ४८ मिनिटांतच एड शीरनचा मुंबई कॉन्सर्ट हाऊसफुल्ल!

एड शीरन त्याच्या ‘शेप ऑफ यू’ या गाण्यामुळे चर्चेत आलाय.

एड शीरन

प्रसिद्ध गायक एड शीरनने सध्या सर्वांनाच त्याच्या आवाजाने वेड लावलं आहे. जस्टिन बिबरच्या भारत दौऱ्याला अनेकांनीच भरभरुन प्रतिसाद दिल्यानंतर आता एड शीरनही त्याच्या आवाजाची जादू मुंबईकरांवर करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लाइव्ह कॉन्सर्टसाठी भारतात येणार असल्याच्या बातमीनेच सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. याच उत्साहाचे पडसाद त्याच्या कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीवर पाहायला मिळत आहेत. ‘बुक माय शो’वर एड शीरनच्या लाइव्ह कॉन्सर्ट्च्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली काय आणि अवघ्या काही मिनिटांतच त्याचा कॉन्सर्ट हाऊसफुल्ल झाला काय.

डायमंड, गोल्ड आणि सिल्व्हर अशा तीन विभागांमध्ये या लाइव्ह कॉन्सर्ट्च्या तिकिट्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तेव्हा आता ज्यांच्या हाती या कॉन्सर्टच्या तिकीट्स लागल्या आहेत त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय असं म्हणायला हरकत नाही. ग्रॅमी पुरस्कार विजेता एड शीरन त्याच्या ‘शेप ऑफ यू’ या गाण्यामुळे चर्चेत आलाय. त्याच्या या गाण्याने बॉलिवूड सेलिब्रिटींनाही वेड लावलंय.

वाचा : ‘लगान’मधील ‘ती’ सध्या काय करते?

सोशल मीडियावर आणि तरुणाईमध्येही त्याच्या या गाण्याची क्रेझ पाहायला मिळतेय. अनेकांनी तर या गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन्सही शेअर केले आहेत. दरम्यान, एड त्याच्या वर्ल्ड टूरमध्ये ‘एशियन लेग’ अंतर्गत त्याचा ‘डिव्हाईड’ या अल्बममधील काही प्रसिद्ध गाणी गाणार आहे. १९ नोव्हेंबरला जिओ गार्डन, बीकेसी मुंबई येथे एड शीरनचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. मुख्य म्हणजे अशा कार्यक्रमामध्ये जाण्यासाठी अनेजण ब्लॅकने तिकीट विकत घेण्याच्या तयारीतही असल्याचं पाहायला मिळतं. पण, अशा कोणत्या अनधिकृत संकेतस्थळावरुन तिकीट खरेदी करुन कार्यक्रमाला हजेरी लावण्याच्या बेतात असेल तर त्यांना तसं करता येणार नाहीये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 6:14 pm

Web Title: singer song writer ed sheeran mumbai concert tickets sold out in just 48 minutes
Next Stories
1 ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होण्यासाठी ‘हानिकारक बापू’ उत्सुक
2 सर्जरीदरम्यान झाला मॉडेलचा मृत्यू, १०० हून जास्त केल्या प्लॅस्टिक सर्जरी
3 वजन कमी करण्यासाठी आलियाचा ‘डाएट प्लॅन’
Just Now!
X