News Flash

‘सिंघम रिटर्न्स’चे मोबाईल अॅप!

हल्ली सोशलमिडीयाच्या माध्यमातून अनोख्या कल्पनांद्वारे चित्रपटाची प्रसिध्दी करणे नवीन राहिलेले नाही.

| July 7, 2014 02:05 am


हल्ली सोशलमिडीयाच्या माध्यमातून अनोख्या कल्पनांद्वारे चित्रपटाची प्रसिध्दी करणे नवीन राहिलेले नाही. या माध्यमाद्वारे करण्यात येणाऱ्या चित्रपटाच्या प्रसिध्दीतील महत्वाची बाब म्हणजे या प्रक्रियेत चाहत्यांनादेखील सामील करून घेता येते. यात आता भर पडली आहे ती बॉलिवूडच्या सिंघमची. याआधी आलेल्या अजय देवगण आणि रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ चित्रपटाने खूप चांगली कामगिरी केली. आता, ही जोडी ‘सिंघम रिटर्न्स’ नावाचा चित्रपट घेऊन येत आहे. ‘सिंघम रिटर्न्स’चा फर्स्टलूक सोमवारी प्रसिध्द करण्यात आला असून, चित्रपटाशीनिगडीत मोबाईल अॅपदेखील प्रसिध्द करण्यात आले आहे. अॅण्ड्रॉइड फोनधारकांसाठी ‘सिंघम रिटर्न्स’ (Singham Returns) नावाचे हे अॅप गुगल प्लेवर उपलब्ध आहे. तुमचे छायाचित्र क्लिक करून, चेहऱ्यावर गॉगल आणि मिशालावून अॅपमध्ये देण्यात आलेल्या चित्रपटाच्या पॉस्टरवर अजयच्या चेहऱ्याच्या जागी तुमचा हा चेहरा लावायचा आहे. त्यानंतर तयार झालेले हे नवीन पोस्टर तुम्ही तुमच्या आवडीच्या सोशलमिडियासाइटवर शेअर करू शकता. याबाबतच्या फेसबुकवरील पोस्टमध्ये अजय म्हणतो, आजपासून तुम्ही सर्व सिंहगर्जना करा आणि #MaiBhiSingham शेअर करा. bit.ly/BecomeSingham1_0 येथून सिंघम अॅप डाऊनलोड करा.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 2:05 am

Web Title: singham returns mobile app
Next Stories
1 ‘दयाबेन’च्या गरब्याच्या ठेक्यावर ‘सीआयडी’ नाचणार
2 ‘झुंज’मध्ये दोन नवीन लढवय्यांचा प्रवेश
3 ‘अपाला’साठी सनी शो स्टॉपर
Just Now!
X