अभिनेत्री नीना गुप्ता यांचे नाव बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्रींच्या यादीत आवर्जुन घेतले जाते. काही दिवसांपूर्वी नीना यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काम मागितले होते. नीना यांना सांस या सिनेमातील प्रिया कपूर या व्यक्तिरेखेने खरी ओळख दिली. याशिवाय वैयक्तिक आयुष्यातही ती एक स्वाभिमानी आणि स्वावलंबी महिला आहे. नीना यांचे खासगी आयुष्य कोणत्याही सिनेमापेक्षा वेगळे नाही. नीना यांनी एका मुलाखतीत सिंगल वुमन असल्याचे दुःख व्यक्त केले होते. नीना म्हणाल्या होत्या की, एकट्या बाईवर समाज ‘अॅव्हेलेबल’चे लेबल सहज लावतो. नीना यांनी २००८ मध्ये विवेक मेहराशी लग्न केले होते. नुकत्याच त्या कान चित्रपट महोत्सवातही त्यांच्या सिनेमाच्या प्रिमिअरला गेल्या होत्या.

https://www.instagram.com/p/BPhK1RdBZDy/

२०१५ मधील एका मुलाखतीत त्यांना भारतात आजही महिलांच्या प्रगतीला विरोध केला जातो का? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना नीना म्हणाल्या की, अजूनही भारतात लोक महिलांना पुढे जाऊ देत नाहीत. एकट्या महिलेकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन अजूनही बदलला नाही. एकट्या बाईला समाजात मान मिळत नाही. एकटी बाई अमूक एक गोष्ट करु शकत नाही. एकट्या बाईला एखादी गोष्ट जमणारच नाही असेच सारखे म्हटले जाते. मला वाटतं जर तुम्हाला या समाजात राहायचं आहे तर या समाजाचे काही नियम पाळावे लागतात. मी पण माझ्या आयुष्यात कठीण काळ पाहिला आहे. मी सिंगल मदर होते, त्यामुळे पुरूष मला पार्टीला बोलवायचे. आता मला कोणी बोलवत नाही, कारण माझं लग्न झालं आहे. या सगळ्या अनुभवांतून गेल्यावर मी नक्कीच म्हणेन की समाज महिलांना पुढे जाऊ देत नाही. काही लोकांना माझं बोलणं खटकेल पण मी समाजातील सिंगल मदर्सना उद्देशून बोलते आहे.’

https://www.instagram.com/p/BiqoLU0gk__/

यानंतर नीना यांना दुसरा प्रश्न विचारण्यात आला की, २० वर्षाच्या नीनाला तुम्हा काय सल्ला द्याल? या प्रश्नाचं उत्तर देताना नीना म्हणाल्या होत्या की, ‘पुरूषांवर लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष दे. पण मी जे काही केलं त्या सगळ्याची जबाबदारी मी घेतली. मी त्या गोष्टीसाठी रडत बसली नाही किंवा व्यसनाच्या आहारीही गेले नाही. मी असं कधीच म्हटलं नाही की त्याने मला फसवलं. त्याच्यासोबत माझं आयुष्य व्यतीत करण्याचा माझा स्वतःचा निर्णय होता. मी रडत नाही. देवाकडून जे चांगलं मिळेल ते घेईन.’ कान चित्रपट महोत्सवात मुलगी मसबाबद्दल बोलताना नीना म्हणाल्या की, ‘मला आनंद होतो जेव्हा लोकं मला माझ्या मुलीच्या नावाने ओळखतात. मला स्वतःचा अभिमान वाटतो.’