लेखक, संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक अजय नाईक यांच्या ‘हॉस्टेल डेज’ या १२ जानेवारी २०१८ रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुख्य भूमिकेतील प्रार्थना बेहेरेसह, अंकिता बोरा, सोनिया पटवर्धन, पूर्वा शिंदे, अंकिता लांडे, सागरिका रुकारी, पूर्वा देशपांडे या तब्बल सहा नवीन आणि फ्रेश चेहऱ्याच्या नायिका या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. यातील काहीजणी व्यावसायिक मॉडेल असून, काही कॉलेजमध्ये शिकत आहेत, तर काही इतर क्षेत्रातील उच्चशिक्षित आहेत.

‘हॉस्टेल डेज’मध्ये प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी, अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पण खरी धमाल असणार आहे ती सहा नवीन मुलींच्या बेधडक अभिनयाची. अंकिता, सागरिका, अंकिता, सोनिया, पूर्वा देशपांडे आणि पूर्वा शिंदे या सर्वजणींचा हा पहिलाच चित्रपट आहे. हॉस्टेलमध्ये या मुली धमाल करायला सज्ज झाल्या आहेत.

Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

PadMan वाचा : ‘पॅडमॅन’ला सापडली त्याची ‘हू ब हू’

अंकिता बोरा ही सीएचा अभ्यास करत आहे. अनेक स्टेज शोजमध्ये तिने सुत्रसंचालन केले आहे. तसेच वकृत्व स्पर्धांमध्ये तिने पारितोषिकेही पटकावली आहेत. सोनिया पटवर्धन सध्या स.प. महाविद्यालयात बारावीमध्ये शिकतेय. तिची आई मृदुल पटवर्धन यांनी अजय नाईक यांच्या ‘लग्न पहावे करून’ आणि ‘बावरे प्रेम हे’मध्ये वेशभूषाकार म्हणून काम केले होते. सोनिया तेव्हा शाळेत होती आणि अजय यांनी त्याचवेळीच ठरवले होते की मोठी झाल्यावर तिला पदार्पणाची संधी द्यायची.

पूर्वा शिंदे हीसुद्धा एक व्यवसायिक मॉडेल असून, तिने अनेक ब्रॅण्ड्ससाठी मॉडेलिंग केले आहे. ‘श्रावण क्वीन’ची अंतिम फेरी तिने गाठली होती. तिथेच तिची निवड नाईक यांनी केली. यातील अंकिता लांडे ही आयुर्वेदामध्ये (BAMS) पदवी शिक्षण घेतेय आणि त्याचबरोबर ती व्यवसायिक मॉडेलही आहे. अनेक फॅशन शोजमध्ये तिने रॅप्मवॉक केला आहे. तसेच काही ब्रॅण्डससाठी मॉडेलिंग केले आहे.

वाचा : प्रतिक बब्बर अडकणार लग्नाच्या बेडीत

सागरिका रूकारी हिने साहित्यामधून बीए केले आहे. तीसुद्धा एक व्यवसायिक मॉडेल असून अनेक फॅशन शोजमध्ये तिने रॅम्प वॉक केला आहे. ती ‘श्रावण क्वीन’ची उप-विजेती होती. पूर्वा देशपांडे सध्या स.प. महाविद्यालयातच एफवायबीएला आहे. महाविद्यालयाकडून पुरुषोत्तम, फिरोदिया, दाजीकाका करंडक अशा स्पर्धांमध्ये तिने सहभाग घेतला. दाजीकाका करंडकचे आयोजक असलेल्या अजय नाईक यांनी तिचे काम पाहिले आणि तिला संधी दिली.

‘हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात तेथील दिवसांची एक वेगळी अशी विशेष आठवण असते. ज्यांनी हे हॉस्टेलचे आयुष्य कधीच अनुभवले नाही, त्यांना या आयुष्याबद्द्ल नेहमीच कुतूहल लागून राहिलेले असते. हॉस्टेलमधील त्या दिवसांबद्दल आठवण आली की कोणीही नॉस्टॅल्जिक होतोच,’ असे चित्रपटाचे दिग्दर्शक अजय नाईक यांनी म्हटले.