23 September 2020

News Flash

हिवाळ्यातील थकवा दूर करण्यासाठी ‘हे’ सहा उपाय कराच

जास्त झोप लागणे, थकवा जाणवणे किंवा उठण्यास कंटाळा येणे ही प्रत्येकांची समस्या आहे.

थंडीची चाहूल लागली आहे आणि तसा माहोलही निर्माण झाला आहे. अशा गुलाबी थंडीत उबदार चादरीत मनसोक्त झोपायला प्रत्येकालाच आवडते. थंडीच्या दिवसात सकाळी कितीही उठण्याचा प्रयत्न केला तरी उठावेसे वाटत नाही. त्यातून असा आराम सोडून कामाला जायचे म्हणजे अनेकांसाठी शिक्षाच. या दिवसात जास्त झोप लागणे, थकवा जाणवणे किंवा उठण्यास कंटाळा येणे ही प्रत्येकांची समस्या आहे. अशा वेळी या गुलाबी थंडीत आळस झटकून टाकण्यासाठी काही गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो…

थंडीच्या दिवसात आळस झटकण्याचा उत्तम पर्याय म्हणजे सूर्यप्रकाश. वातावरणात थंडावा असतो अशावेळी सकाळची कोवळी सूर्यकिरणे अंगावर पडली की आळस कुठच्या कुठे पळून जातो.

व्यायाम हा थंडीच्या दिवसात थकवा घालवण्याचा उत्तम उपाय आहे. आधीच व्यायम म्हटल्यावर आपल्या कपाळाला आठ्या पडतात त्यातून थंडीच्या दिवसात व्यायाम करणे म्हणजे सगळ्यात कठीण काम. पण दिवसभराचा थकवा घालवायचा असेल तर व्यायाम हा उत्तम पर्याय आहे.

रात्रीच्या वेळी जड पदार्थ खाणे टाळा. शक्यतो झोपण्यापूर्वी तीन तास आधी काहीच खाऊ नका.

गाजर, संत्री, मोसंबी, मटार यासारख्या हिवाळ्यात येणा-या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा.

हिवाळ्यात ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेही थकावा जाणवू शकतो. अशावेळी ‘ड’ जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांच्या आहारात समावेश करून घ्या.

झोपण्यापूर्वी एक तास आधी पंखे किंवा एसी पूर्णपणे बंद ठेवा. त्यामुळे थंडीच्या दिवसात घर उबदार राखण्यास मदत होते.

थंडीच्या दिवसात आधीच सूर्यप्रकाश कमी असतो त्यातून वातावरणात गारवा असतो त्यामुळे मनही काहीसे खिन्न आणि उदास असते अशा वेळी दिवसाची सुरूवात छान गाणी ऐकून करा. तितकेच प्रसन्न वाटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 4:43 pm

Web Title: six ways winter laziness tress morning nck 90
Next Stories
1 पावनखिंड गाजवणाऱ्या बाजीप्रभूंची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर
2 “..म्हणून मला ‘मुझे सेक्स बहुत पसंद है’ हा डायलॉग बोलताना विचित्र वाटलं नाही”
3 आर्चीचा नवा ‘मेकअप’: पहिली झलक पाहिली आहे का?
Just Now!
X