News Flash

‘स्लमडॉग मिलेनिअर’फेम अभिनेत्याविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप

मधुर आणि पीडितेची डिसेंबर २०२० मध्ये भेट झाली होती.

‘स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटातील अभिनेता मधुर मित्तलविरोधात लैंगिक अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्याविरोधात मारहाण आणि लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली आहे. मुंबईतील खार पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. १३ फेब्रुवारी रोजी मधुरने एक्स गर्लफ्रेंडच्या घरी जात तिला मारहाण केल्याचं तिने या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

‘रिपब्लिक भारत’नुसार, मारहाण करुन जखमी करणे आणि लैंगिक अत्याचार या आरोपांखाली मधुरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना घडण्याच्या दोन दिवसापूर्वी मधुर आणि पीडित तरुणीचा ब्रेकअप झाला होता. ११ फेब्रुवारी रोजी ते विभक्त झाले होते. मात्र, त्यानंतर १३ फेब्रुवारीला मधुरने पीडितेच्या घरात घुसून तिला मारहाण केली, असं पीडित तरुणीच्या वकिलांनी सांगितलं.

मधुर प्रचंड रागात होता त्यामुळे कोणाशीही न बोलता तो थेट पीडितेच्या घरात शिरला आणि त्याने पीडितेची मान पकडून तिच्या कानशिलात लगावल्या. तसंच तिचे केस, कान ओढले. इतकंच नाही तर तिच्या डोळ्यांवर त्याने मुक्का मारला, असं दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

मधुर आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडची भेट डिसेंबर २०२० मध्ये झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच मधुरने मद्याच्या नशेत तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी या दोघांनी ब्रेकअप केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 8:49 am

Web Title: slumdog millionaire actor madhur mittal booked for alleged sexual assault ssj 93
Next Stories
1 नाटय़ परिषद अध्यक्षपदाच्या वादाला नवे वळण
2 भारतात आल्यावर नोराला बसला मोठा धक्का; लोकप्रियतेचं शिखर गाठण्यापर्यंतचा प्रवास…
3 ‘तुझं माझं जमतंय’च्या सेटवर ‘पार्टी हो रही है!!!’
Just Now!
X