|| तेजश्री गायकवाड

छोट्या पडद्यावरच्या मनोरंजन विश्वाचा पसारा हा भलामोठा आहे. हिंदी, इंग्रजी ते प्रत्येक प्रादेशिक भाषेतील वाहिन्या, मालिका आणि कलाकारांचा घरोघरी मनोरंजनाचा राबता सुरू असतो. त्यांची लोकप्रियतेची समीकरणंही वेगळी असतात. सध्या या इंडस्ट्रीचा विस्तार एवढा वाढला आहे की भाषेची बंधनं सोडून अनेकदा मराठी किं वा बंगाली भाषेत गाजलेल्या मालिकांचा हिंदी रिमेक पहायला मिळतो. कधी एखाद्या लोकप्रिय हिंदी मालिके चा प्रादेशिक अवतार पहायला मिळतो. कलाकारांच्या बाबतीतही आता हे भाषेचं बंधन उरलेलं नाही. याआधी अनेक मराठी कलाकारांनी हिंदी मालिकांमधून आपली ओळख निर्माण के ली आहे, मात्र सध्या मालिके तील तरूण कलाकार मंडळी सहज मराठीतून हिंदी किं वा हिंदीतून मराठी असा उलटसुलट प्रवास करताना दिसत आहेत. चांगल्या भूमिकाच्या शोधात असलेल्या या कलाकारांनी भाषेचा अडसर सहजी पार के ला आहे.

मनोरंजनाला भाषेची मर्यादा नसते. म्हणूनच आता मनोरंजनसृष्टीत दाक्षिणात्य कलाकार मराठीमध्ये, मराठीतील कलाकार हिंदी, तमिळ भाषांमध्ये काम करतांना दिसतात. त्यातही प्रादेशिक मालिका-चित्रपटातून काम करणारे कलाकार हिंदीच्या मुख्य धारेत आले की त्यांना देशभरातील प्रेक्षकवर्ग ओळखू लागतो. त्यामुळे हिंदी मालिके त काम करण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. नीना कु लकर्णी, मृणाल कु लकर्णी, स्वाती चिटणीस, निशिगंधा वाड, सविता प्रभुणे, शुभांगी गोखले, मानसी साळवी, मिलिंद गुणाजी, स्वप्नील जोशी, राके श बापट, पूर्वा गोखले, स्नोहा वाघ अशा कित्येक मराठी कलाकारांनी याआधीच हिंदी मालिकांमध्ये काम करत आपली एक वेगळी ओळख निर्माण के ली आहे. मधल्या काळात अनेक कलाकारांनी मराठी मालिकांमध्येच काम करण्यावर भर दिला होता. आता पुन्हा एकदा नव्या तरूण कलाकारांनी हिंदीत पाय रोवायला सुरूवात के ली आहे. गश्मीर महाजनी आणि मयुरी देशमुख हे दोघेही सध्या ‘स्टार प्लस’च्या ‘इमली’ मध्ये काम करत आहेत. तर हेमांगी कवीचं ‘स्टार भारत’वरच्या ‘तेरी लाडली मै’ या मालिके तील उर्मिलाचं पात्र चांगलंच लोकप्रिय ठरलं आहे. ‘सोनी टेलीव्हिजन’वरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिके तही  राजेश श्रुंगारपुरेसह सुखदा खांडकेकर, स्नोहलता वसईकर असे मराठमोळे चेहरे दिसत आहेत. ‘रात्रीस खेळ चाले १’ मधून घराघरात पोहोचलेला आदिश वैद्य सध्या ‘गुम है किसीके प्यार मे’ या मालिकेमध्ये काम करतो आहे. त्याने  हिंदीतील प्रसिद्ध मालिका ‘नागिन’च्या तिसऱ्या पर्वासह  ‘बैरीस्टर बाबू’, ‘साम दाम दंड भेद’ या मालिकांमध्येही काम केलं आहे.

एकीकडे मराठीतून हिंदी पोहोचलेले कलाकार आहेत, तसेच हिंदी मालिकांमधून सुरूवात करून तिथे लोकप्रियता मिळाल्यानंतर मराठीत काम करणारे कलाकारही आहेत. अभिनेत्री अभिज्ञा भावेने ‘प्यार की एक कहानी’मध्ये छोटंस पात्र रंगवलं होतं. काही मराठी मालिकांमधून काम के ल्यानंतर ८ वर्षांनी पुन्हा एकदा ती ‘बावरा दिल’या हिंदी मालिके त काम करते आहे. अभिज्ञाप्रमाणेच शिवानी सुर्वेनेही हिंदी मालिकांमधून काम के ल्यानंतर ‘देवयानी’ ही मराठी मालिका के ली होती. तर आता नव्या दमाची सुंदरा म्हणजे अक्षया नाईकनेही हिंदी ते मराठी असा प्रवास के ला आहे. भूमिकांमधलं वैविध्य, वाढता प्रेक्षकवर्ग, आर्थिक स्थैर्य आणि वेगवेगळ्या भाषेत काम करण्याचं समाधान अशा कारणांमुळे कलाकार सध्या भाषेचा विचार न करता हिंदी, मराठी किं वा अन्य भाषेत काम करण्यावर भर देताना दिसतात.

‘भाषेवर प्रभुत्व हवं’

मी सुरुवात जरी हिंदी मालिकांमधून केली असली तरी मला नेहमीच मराठी मालिकांचं आकर्षण होतं. माझी आजी नेहमी म्हणायची की तुला कधी तरी मराठीमध्ये काम करायची संधी मिळायला हवी, पण मला योग्य मार्ग सापडत नव्हता. मी खूप ऑडीशन सुद्धा देत होते. शेवटी लतिकाच्या भूमिके ने माझी आणि माझ्या घरच्यांची इच्छा पूर्ण झाली. हिंदीतून मराठी किं वा अगदी उलट पध्दतीने काम करत असतानाही तुमचं भाषेवरचं प्रभुत्व महत्वाचं ठरतं. माझ्या पहिल्या हिंदी मालिकेमध्ये माझं पात्र हे मराठी मुलीचंच होतं. त्यामुळे मी उत्तमरित्या मुंबईवाली हिंदी मराठी मिश्र भाषा बोलत होते. त्यानंतरच्या मालिकेत माझं पात्र राजस्थानी असल्यामुळे मला माझ्या हिंदीवर खूप काम करावं लागलं. हळूहळू हिंदीतून विचार करायची मला सवय लागली. त्यामुळे मला जेव्हा मराठी मालिकेत काम करायची संधी मिळाली तेव्हा सुरुवातीला थोडंसं जड गेलं. माझी मातृभाषा मराठीच असल्यामुळे मी सहज उत्तम मराठी बोलू लागले. – अक्षया नाईक – सुंदरा मनामध्ये भरली

 

‘प्रेक्षकवर्ग वाढतो’

मला दोन्ही भाषांमध्ये काम करण्याची संधी सतत मिळत गेली. त्यामुळे अनेक वेगवेगळी पात्रं रंगवता आली. दोन वेगवेगळ्या भाषांमधील मालिके त काम करताना जास्त फरक जाणवत नाही, कारण काम करण्याची पद्धत थोड्याफार फरकाने सारखीच असते. परंतु तुम्ही दुसऱ्या भाषेत काम करता तेव्हा तुम्हाला मोठा प्रेक्षकवर्ग मिळतोच. सध्या मी मल्हारराव होळकरांची भूमिका करतो आहे.  एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं. तसंच एका स्त्रीच्या मागे पुरुषाने भक्कमपणे उभं राहावं असंही म्हटलं जातं. मल्हाररावांनी ही गोष्ट आधीच के ली होती.  ते अहिल्याबाई होळकरांच्या मागे खंबीरपणे होते. अशा वेगवेगळ्या भाषेतील मालिकांमधून तितक्याच वैविध्यपूर्ण भूमिका करण्याचा, त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आनंद मला निश्चिातपणे मिळतो.– राजेश श्रुंगारपुरे – पुण्यश्लोक अहिल्याबाई

‘प्रेक्षकवर्ग वाढतो’

मला दोन्ही भाषांमध्ये काम करण्याची संधी सतत मिळत गेली. त्यामुळे अनेक वेगवेगळी पात्रं रंगवता आली. दोन वेगवेगळ्या भाषांमधील मालिके त काम करताना जास्त फरक जाणवत नाही, कारण काम करण्याची पद्धत थोड्याफार फरकाने सारखीच असते. परंतु तुम्ही दुसऱ्या भाषेत काम करता तेव्हा तुम्हाला मोठा प्रेक्षकवर्ग मिळतोच. सध्या मी मल्हारराव होळकरांची भूमिका करतो आहे.  एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं. तसंच एका स्त्रीच्या मागे पुरुषाने भक्कमपणे उभं राहावं असंही म्हटलं जातं. मल्हाररावांनी ही गोष्ट आधीच के ली होती.  ते अहिल्याबाई होळकरांच्या मागे खंबीरपणे होते. अशा वेगवेगळ्या भाषेतील मालिकांमधून तितक्याच वैविध्यपूर्ण भूमिका करण्याचा, त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आनंद मला निश्चिातपणे मिळतो. – राजेश श्रुंगारपुरे – पुण्यश्लोक अहिल्याबाई