बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय गेल्या काही दिवसांपासून एक्झिट पोलच्या ट्विटमुळे विवादात सापडला आहे. या ट्विटमधील मीममुळे त्याचा राजकीय नेत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली तर राज्य व केंद्रीय महिला आयोगाने नोटीसही पाठवली आहे. एका ट्विटने विवेकच्या स्टारडमवर चांगला परिणाम केला आहे. एक स्वयंसेवी संस्थेने देखील विवेकला कार्यक्रमातून वगळले आहे.

गेल्या काही दिवसांपासून विवेक ओबेरॉय स्माईल फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेसाठी कार्यरत होता. परंतु विवेकने शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे स्माईल फाउंडेशन त्याला या कार्यक्रमातून वगळले आहे. ‘आमची संस्था महिला सशक्तीकरणाचे काम करते. विवेक ओबेरॉयचे वक्तव्य आमच्या विचारसरणी जुळत नाही’ असे संस्थेकडून सांगण्यात आले आहे. स्माईल फाउंडेशनने ओदिशा येथे झालेल्या फॅनी चक्रीवादळानंतर तेथे फंड रेजिंग कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला होता आणि या कार्यक्रमात विवेक सहभागी होणार होता. आता स्माईल फाउंडेशने विवेकला या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे.

दरम्यान एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर विवेकने एका मीमच्या माध्यमातून ऐश्वर्या रायचा भूतकाळ समोर आणला होता. या मीममध्ये तीन फोटो होते. पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत असलेला फोटो होते त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले होते. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय असा फोटो होता. त्या फोटोतएग्झिट पोल असे लिहिले होते. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अराध्या यांचा फोटो होता. त्याफोटोखाली रिझल्ट असे लिहिले होते. हे मीम विवेक ओबेरॉयने तयार केलेले नाही. मात्र ते शेअर करत हे मीम आपल्याला खरोखरच आवडले अशी प्रतिक्रिया दिली होती. या मीमबरोबर विवेकने हे खूप क्रिएटिव्ह आहे. हे राजकारण नाही, फक्त आयुष्यच समजा, असं त्याने म्हटले होते.