News Flash

#SmilePleaseAnthem : सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारे गाणे नक्की बघा

या अँथम साँगमध्ये उर्मिला मातोंडकरपासून मुक्ता बर्वेपर्यंत बरेच मराठी कलाकार पाहायला मिळत आहेत.

सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘हृदयांतर’ चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक विक्रम फडणीस ‘स्माईल प्लीज’ हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटातील एक नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘स्माईल प्लीज अँथम साँग’मध्ये उर्मिला मातोंडकरपासून मुक्ता बर्वेपर्यंत बरेच मराठी कलाकार पाहायला मिळत आहेत.

‘चल पुढे’ असं या गाण्याचे बोल असून सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारं गाणं अशी टॅगलाइन त्याला देण्यात आली आहे. विक्रम फडणीस या गाण्याची सुरुवात करतात आणि मग पुढे उर्मिला मातोंडकर, महेश मांजरेकर, शरद केळकर, सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, उमेश कामत, प्रिया बापट, मानसी नाईक, रेणुका शहाणे, मेघा धाडे असे बरेच कलाकार गाताना पाहायला मिळतात. मंदार चोळकरने हे गाणं शब्दबद्ध केलं आहे.

Photo : समीरा रेड्डीचं अंडरवॉटर प्रेग्नंसी फोटोशूट

‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट आयुष्याकडे पाहण्याचा आणि आयुष्य आनंदाने जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देणारा आहे. चित्रपटाच्या निमित्ताने विक्रम आणि मुक्ता पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. हॅशटॅग फिल्म स्टुडिओच्या निशा शाह आणि क्रित्यावत प्रॉडक्शनच्या सानिका गांधी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटाचे संगीतकार रोहन-रोहन आहेत. चित्रपटातील गाणी मंदार चोळकर यांची तर छायाचित्रण मिलिंद जोग यांचे आहे. येत्या १९ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 6:03 pm

Web Title: smile please anthem song chal pudhe from urmila matondkar to mukta barve in this heartwarming number ssv 92
Next Stories
1 वेबविश्वातलं मराठी धाडस ‘संतुर्की गोष्ट संत्या-सुरकीची…’
2 Photo : समीरा रेड्डीचं अंडरवॉटर प्रेग्नंसी फोटोशूट
3 हे आहेत हृतिकच्या आयुष्यातील ‘सुपर टीचर्स’
Just Now!
X