मराठी सिनेसृष्टीत चांगले विषय अगदी कसोशीने हाताळले जात आहेत ज्यामुळे या चित्रपटांच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा आलेख उंचावण्यामागे इतर अनेक गोष्टींबरोबरच फ्रेश चेहरे आणि हटके जोड्या महत्त्वाचा वाटा उचलतात. हिंदीप्रमाणेच आता मराठी चित्रपटांतही अभिनेता – अभिनेत्रींचे फ्रेश पेअरींग आपल्याला पाहायला मिळते. अशीच एक फ्रेश जोडी ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’च्या निमित्ताने आपल्यासमोर येत आहे.
‘पप्पी दे पारूला फेम’ स्मिता गोंदकर आणि ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेतून घराघरात ओळखीचा झालेला चेहरा म्हणजेच राजेंद्र शिसतकर ही फ्रेश जोडी ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’ चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या भेटीला येत आहे. ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’च्या निमित्ताने एकमेकांना ‘अनवॉन्टेड’ झालेल्या या जोडीतील मिस्टर अनवॉन्टेड राजेंद्र शिसतकर पहिल्यांदाच एका रोमॅण्टिक भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. तर मिसेस अनवॉन्टेड अवघ्या महाराष्ट्राची कांताबाई म्हणजेच स्मिता गोंदकर तिच्या नेहमीच्या ग्लॅमरस भूमिकांपासून वेगळी भूमिका करत आहे. स्मिता गोंदकरचा आजवर न पाहिलेला अंदाज आपण ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टे’च्या निमित्ताने अनुभवणार आहोत. वॉन्टेड – अनवॉन्टेडच्या या जगात घर आणि करिअरचा मेळ साधताना बऱ्याचदा वॉन्टेड अनवॉन्टेड कधी होते, हे आपले आपल्यालाही कळत नाही. असंच काहीसं मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड चित्रपटामध्ये स्मिताचे ही झाले आहे.
अशी ही अनोखी जोडी असणाऱ्या ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’ चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक दिनेश अनंत यांनी केले असून चित्रपटाची कथा प्रकाश गावडे यांची आहे. उर्वी एंटरप्रायजेस निर्मित ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’ चित्रपटाचे निर्माते मितांग भूपेंद्र रावल आहेत. अनोख्या विषयाबरोबरच एक हटके जोडी आपल्यासमोर आणणारा ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’ येत्या २३ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
A photo posted by Smita Gondkar (@smita.gondkar) on
Sundays be like💁🏻 #CuddlesWithYourBlanket Inshort being #Lazy 😁👅
A photo posted by Smita Gondkar (@smita.gondkar) on
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2016 1:52 pm